शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

''रालोआच्या राजवटीत देशात भीतीचे वातावरण''

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 05:07 IST

राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ) सरकारच्या राजवटीत देशामध्ये भीती, हिंसाचार व तणावाचे वातावरण आहे, असा आरोप राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सोमवारी केला.

कोटा : राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ) सरकारच्या राजवटीत देशामध्ये भीती, हिंसाचार व तणावाचे वातावरण आहे, असा आरोप राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सोमवारी केला. त्यांनी पत्रकारांना सांगितले की, देशात आर्थिक मंदीमुळे लोक नोकऱ्या गमावत असून, दुसºया बाजूला रोजगाराच्या संधी निर्माण होणे बंद झाले आहे. त्यामुळे भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होऊ शकतो. रालोआ सरकार सत्तेवर आल्यानंतर देशातील माहोल बिघडला आहे. अशा प्रकारची धोकादायक स्थिती देशात प्रथमच निर्माण झाली आहे.कोटा येथील पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी अशोक गेहलोत तिथे आले होते. ते म्हणाले की, देशाला आर्थिक मंदीच्या झळा बसत आहेत. नजीकच्या काळात ही स्थिती आणखी बिघडेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकीर्दीत भारतातील लोकशाही धोक्यात आली आहे. देशातील स्थिती बिघडली असून, त्या परिस्थितीला नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व रालोआ सरकार जबाबदार आहे. समाजातील एकही घटक आज समाधानी नाही, तरीही ते मोदी-मोदीचा गजर करीत आहेत कारण जनता दहशतीखाली आहे. (वृत्तसंस्था)>काश्मीरमध्ये मानवी हक्कांची गळचेपीराजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सांगितले की, काश्मीरमध्ये गेल्या चाळीस दिवसांपासून स्थानिक लोकांना जणू घरात कोंडून ठेवले आहे.मोबाईल, इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी संचारबंदीपासून अन्य निर्बंधही लादण्यात आले. या कारवाईमुळे मानवी हक्कांची गळचेपी झाली आहे. काश्मीरमध्ये सध्या नेमके काय चालले आहे, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला सांगितले पाहिजे, असेही गेहलोत म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहा