प्रवाशांसाठी खुशखबर... ९ ऑक्टोबरपासून दुरंतो अन् विदर्भ एक्स्प्रेस धावणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2020 03:09 PM2020-10-07T15:09:52+5:302020-10-07T15:11:26+5:30

प्रवाशांची मागणी फळाला : मध्य रेल्वे मुंबई विभागातून नव्याने पाच गाड्या होणार सुरू

Duranto, Vidarbha Express to run from October 9 | प्रवाशांसाठी खुशखबर... ९ ऑक्टोबरपासून दुरंतो अन् विदर्भ एक्स्प्रेस धावणार

प्रवाशांसाठी खुशखबर... ९ ऑक्टोबरपासून दुरंतो अन् विदर्भ एक्स्प्रेस धावणार

googlenewsNext

अमरावती : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी २४ मार्चपासून ‘लॉकडाऊन’ आहे. परिणामी रेल्वे गाड्यांची चाकेसुद्धा थांबली आहे. मात्र, अनलॉकमध्ये काही रेल्वे गाड्या सुरू करण्यात येत आहेत. मुंबई मध्य रेल्वे विभागातून नव्याने पाच गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात गोंदिया-मुंबई विदर्भ एक्स्प्रेस आणि नागपूर - मुंबई दुरंतो सुपरफास्ट ही गाडी ९ ऑक्टोबरपासून दररोज धावणार आहे. याबाबतची अधिसूचना ६ आॅक्टोबर रोजी निर्गमित करण्यात आली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई- नागपूर (गाडी क्रमांक ०२२८९) ही १० आॅक्टोबर, तर नागपूर- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई (गाडी क्रमांक ०२२९०) दुरंतो एक्स्प्रेस ही गाडी ९ आॅक्टोबरपासून दररोज धावणार आहे. सीएसएमटी- गोंदिया (गाडी क्रमांक ०२१०५) ही ट्रेन ९ आॅक्टोबर, तर गोंदिया- सीएसएमटी (गाडी क्रमांक ०२१०६) विदर्भ एक्स्प्रेस ही गाडी १० आॅक्टोबरपासून दररोज धावणार आहे. या दोन्ही रेल्वे गाड्या सुरू होत असल्याने प्रवाशांना ये-जा करणे सुकर होणार आहे. पूर्वीच्याच रेल्वे स्थानकावर दुरंतो, विदर्भ एक्स्प्रेसला थांबा असणार आहे. आरक्षण तिकीट घेऊनच प्रवास करावा लागेल, अशी माहिती बडनेरा रेल्वे स्थानकाचे मुख्य खंड वाणिज्य निरीक्षक शरद सयाम यांनी दिली. अहमदाबाद, मुंबईकडे ये-जा करण्यासाठी हावडा- मुंबई मेल, हावडा- अहमदाबाद एक्स्प्रेसदेखील आता दररोज सुरू आहे.

सीएसएमटी- पुणे, सुरत एक्स्प्रेस सुरू

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते पुणे (गाडी क्रमांक ०२१२३), पुणे-सीएसएमटी (गाडी क्रमांक ०२१२४), सीएसएमटी- पुणे (०२०१५), पुणे- सीएसएमटी (गाडी क्रमांक ०२०१६), सीएसएमटी- सुरत (गाडी क्रमांक ०२११५), सुरत- सीएसएमटी (गाडी क्रमांक ०२११६) या सुपर फास्ट गाड्या ९ आॅक्टोबरपासून दररोज धावणार असल्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

Web Title: Duranto, Vidarbha Express to run from October 9

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.