Jaipur Accident: डंपर बनला काळ! कारला धडक देत ५ वाहनांना उडवले, ५० जणांना चिरडले, १० जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 15:38 IST2025-11-03T15:38:19+5:302025-11-03T15:38:49+5:30
Accident In Jaipur: राजस्थानमधील जयपूर येथे एक भीषण अपघात झाला आहे. येथे एका सुसाट डंपरने एका कारला धडक दिल्यानंतर आणखी ४ वाहनांना उडवले. या अपघातात १० जणांचा मृत्यू झाला असून, सुमारे ४० जण जखणी झाले आहेत.

Jaipur Accident: डंपर बनला काळ! कारला धडक देत ५ वाहनांना उडवले, ५० जणांना चिरडले, १० जणांचा मृत्यू
राजस्थानमधील जयपूर येथे एक भीषण अपघात झाला आहे. येथे एका सुसाट डंपरने एका कारला धडक दिल्यानंतर आणखी ४ वाहनांना उडवले. या अपघातात १० जणांचा मृत्यू झाला असून, सुमारे ४० जण जखणी झाले आहेत. जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर आणखी काही जण कारखाली दबलेले असण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात हरमाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोहामंडी रोडवर झाला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार रस्त्यावर काळ बनून आलेला हा डंपर समोर दिसेल त्याला चिरडत पुडे गेला. त्यामुळे या डंपरखाली सुमारे ५० जण चिरडले गेले. सदर डंपरच्या चालकाने मद्यपान केलेले होते. पहिल्या कारला धडक दिल्यानंतर हा डंपर तिथेच थांबला नाही तर त्याने आणखी चार गाड्यांना धडक दिली. आणखी एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, सदर डंपरचालक एक ते पाच किमी अंतरामध्ये समोर जो कुणी आला त्याला चिरडत पुढे गेला.
या अपघाताबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका डंपर चालकाने ५ कारनां धडक देत सुमारे ५० जणांना चिरडले. त्यात १० जणांचा मृत्यू झाला. तर ४० जण जखमी झाले. जखमींना रुग्णायलात दाखल करण्यात आले आहे. सदर डंपरचालक मद्यधुंद अवस्थेत होता. दरम्यान, या डंपरने चिरडलेल्या कारखाली आणखी काही जण दबलेले असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.