शहरं
Join us  
Trending Stories
1
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
2
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
3
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
4
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
5
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
6
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
7
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
8
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
9
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
10
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
11
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
12
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
13
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
14
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
15
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
16
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
17
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
18
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
20
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
Daily Top 2Weekly Top 5

डंपरने कारला चिरडले; पती-पत्नी ठार मन्यारखेडा फाट्याजवळ झाला अपघात : मुलगी गंभीर जखमी, डंपर चालक फरार

By admin | Updated: December 27, 2015 00:18 IST

नशिराबाद/जळगाव: भरधाव वेगाने जाणार्‍या डपंर समोरुन येणार्‍या कारला जोरदार धडक दिल्याने त्यात कारमधील जयंत प्रभाकर शिंदे (वय ४४ रा.गजानन नगर, भुसावळ) व त्यांची पत्नी अर्चना शिंदे हे दोघेजण जागीच ठार झाले तर मुलगा शशांक (वय ९) हा गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात शनिवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास महामार्गावरील मन्यारखेड्या फाट्याजवळ झाला. शिंदे हे रेल्वेत मालगाडीचे चालक होते.दरम्यान,याच जागेपासून काही अंतरावर दुपारी ट्रक व दुचाकीचा अपघात झाला होता.त्यात रेल्वेचेच निवृत्त चालक ज्ञानदेव शंकर कोळी हे ठार झाले होते.

नशिराबाद/जळगाव: भरधाव वेगाने जाणार्‍या डपंर समोरुन येणार्‍या कारला जोरदार धडक दिल्याने त्यात कारमधील जयंत प्रभाकर शिंदे (वय ४४ रा.गजानन नगर, भुसावळ) व त्यांची पत्नी अर्चना शिंदे हे दोघेजण जागीच ठार झाले तर मुलगा शशांक (वय ९) हा गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात शनिवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास महामार्गावरील मन्यारखेड्या फाट्याजवळ झाला. शिंदे हे रेल्वेत मालगाडीचे चालक होते.दरम्यान,याच जागेपासून काही अंतरावर दुपारी ट्रक व दुचाकीचा अपघात झाला होता.त्यात रेल्वेचेच निवृत्त चालक ज्ञानदेव शंकर कोळी हे ठार झाले होते.
मृतदेह काढण्यास लागला सव्वा तास
अपघात इतका भयानक होता की, कारचा संपूर्ण चेंदामेंदा झाला आहे. त्यात चालक शिंदे हे त्यात अडकले होते. मृतदेह हाताने काढण्याचा प्रयत्न केला असता निघत नव्हता. शेवटी क्रेन व लोखंडी टॅमीच्या सहायाने मृतदेह बाहेर काढावा लागला. यासाठी तब्बल सव्वा तास लागला. अर्चना शिंदे व शशांक यांना तातडीने गोदावरी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी अर्चना यांना मृत घोषित केले. तर जयंत शिंदे यांचा मृतदेह रात्री दहा वाजता जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला.
दुपारी ड्युटी करून शिंदे जळगावात
जयंत शिंदे हे शनिवारी दुपारपर्यंत ड्युटीवर होते. त्यानंतर पत्नी व मुलाला घेऊन ते कारने जळगावात आले होते. काम आटोपून भुसावळला घरी जाण्यासाठी रात्री साडे सात वाजता ते जळगावातून निघाले. मन्यारखेडा फाट्याजवळ त्यांना समोरून येणार्‍या विना क्रमांकाच्या वाळूच्या डंपरने जोरदार धडक दिली. त्यांच्या खिशातील ड्रायव्हींग लायसन्स व मोबाईलवरुन पोलिसांनी त्यांची ओळख पटविली. जळगावला मृतदेह आणल्यानंतर त्यांचे मित्र रेल्वे चालक राजेंद्र मुरलीधर बडगुजर यांनी पत्नीसह रुग्णालयात धाव घेऊन नातेवाईक व मित्र परिवाराला घटनेची माहिती दिली.
मुलगी औरंगाबादला
शिंदे यांना शशांक हा मुलगा व उर्वशी (वय १६) ही मुलगी आहे. उर्वशी ही औरंगाबाद येथे मामाकडे शिक्षणाला आहे. आईचे दोन वर्षापूर्वर्ी निधन झाले आहे. वडील वयोवृध्द असून भुसावळलाच राहतात. एक भाऊ व चार बहिणींचे लग्न झालेले आहे.१९९६ पासून ते रेल्वेत नोकरीला होते.