शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

काझिरंगा डॉक्युमेंट्रीमुळे व्याघ्र प्रकल्पाची BBCवर ५ वर्षांची बंदी

By admin | Updated: February 28, 2017 12:31 IST

राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्रकल्पाने बीबीसी वृत्तवाहिनी व त्यांचा रिपोर्टर जस्टीन रॉलेट यांच्यावर पाच वर्षांची बंदी घातली आहे.

ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि.२८ - राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्रकल्पाने (NTCA) बीबीसी वृत्तवाहिनी व त्यांचा रिपोर्टर जस्टीन रॉलेट यांच्यावर पाच वर्षांची बंदी घातली आहे. ' काझिरंगा नॅशनल' पार्कमधील गेंड्यांच्या संवर्धनासाठी शिका-यांविरोधात अवलंबवण्यात येणा-या कठोर कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा माहितीपट (डॉक्युमेंट्री)  बीबीसीने तयार केला होता. मात्र यामुळे वाद निर्माण झाला होता. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्रकल्पाने बीबीसीच्या संपूर्ण नेटवर्कवर बंदी घातली आहे. 
टाईम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे. बीबीसीचा दक्षिण आशियाचा रिपोर्टर जस्टीन रॉलेट याने गेंड्यावर ' वन वर्ल्ड : किलींग फॉर कन्झर्व्हेशन' ही डॉक्युमेंट्री तयार केली होती. गेंड्यांच्या संरक्षणांसाठी करण्यात येणा-या कारवाईवर या डॉक्युमेंट्रीमध्ये प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. ' अभयारण्यातील गेंड्यांच्या  जीवाला कोणापासूनही धोका आहे असे वाटल्यास त्याला गोळी घालण्याचे अधिकार अभयारण्यातील सुरक्षारक्षकांना देण्यात आल्याचा' दावा या डॉक्युमेंट्रीमध्ये करण्यात आला आहे. तसेच यामुळे गेंड्यापेक्षाही अधिक मनुष्य मारले गेले, असा दावाही त्यात करण्यात आला आहे. 
ही डॉक्युमेंट्री प्रसिद्धीपूर्वी परीक्षणासाठी पाठवण्याची सूचना बीबीसीला केली होती. ' मूळ संकल्पनेचे सादरीकरण करताना संतुलन गमावले आहे का, तसेच गाभा सोडून आशय भलतीकडे भरकटला आहे का, हे तपासणे हा त्यामागचा हेतू होता. परंतु बीबीसीने डॉक्युमेंट्री पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय  आणि परराष्ट्र मंत्रालयाकडे  सुपूर्दच केलेली नाही. त्यामुळे गैरलागू असलेला भाग त्यातून वगळणे अद्याप शक्य झालेले नाही, असे सोमवारी सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले.