"दुबईच्या शेखला सेक्स पार्टनर हवा," बाबा चैतन्यानंदाची विद्यार्थीनींकडे अश्लील मागणी; चॅटमध्ये नेमके काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 08:46 IST2025-10-01T08:45:55+5:302025-10-01T08:46:46+5:30
दिल्लीतील वसंत कुंज लैंगिक शोषण प्रकरणात पोलिसांनी एक मोठा खुलासा केला आहे. बाबा चैतन्यानंद याच्या व्हॉट्सअॅप चॅट्स तपासल्या त्यावेळी अनेक गोष्टी समोर आल्या आहेत.

"दुबईच्या शेखला सेक्स पार्टनर हवा," बाबा चैतन्यानंदाची विद्यार्थीनींकडे अश्लील मागणी; चॅटमध्ये नेमके काय?
दिल्लीतील स्वयंघोषित बाबा चैतन्यानंद सरस्वतीचे काळे कारनामे आता एकामागून एक उघड होत आहेत. दिल्ली पोलीस चैतन्यानंदची कसून चौकशी सुरू केली आहे. पोलिसांना चैतन्यानंदचे व्हॉट्सअॅप चॅट्स सापडले आहेत, यामध्ये तो मुलींशी अश्लील बोलत असल्याचे दिसून येत आहे. तो एका चॅटमध्ये दुबईच्या एका शेखसाठी सेक्स पार्टनरची मागणी करत आहे.
चैतन्यानंद अनेक विद्यार्थीनींसोबत व्हॉट्स अॅपवर संभाषण करत होता. एका विद्यार्थीनीकडे त्यानी अश्लील मागणी केली. यावेळी विद्यार्थीनीने नकार दिला. यामुळे चैतन्यानंद संतापला. त्यानंतर चैतन्यानंदने सकाळी पुन्हा विद्यार्थीनीला मेसेज केला.
फिलीपिन्समध्ये भूकंपाचा धक्का, २२ जणांचा मृत्यू; अनेक इमारती कोसळल्या
मेसेजमध्ये नेमके काय?
चैतन्यानंद: "दुबईतील एका शेखला सेक्स पार्टनर हवा आहे. तुमच्या काही चांगल्या मैत्रिणी आहेत का?"
पीडित: "माझे कोणीच नाहीत."
चैतन्यानंद: "हे कसे शक्य आहे?"
पीडित: "मला माहित नाही."
चैतन्यानंद: "तुझी कोणी वर्गमित्र आहे की कनिष्ठ?"
याशिवाय, बाबा चैतन्यानंद आणि एका विद्यार्थीनीमधील आणखी एक चॅटींग समोर आले आहे. यामध्ये, बाबा विद्यार्थीनीला अश्लील संदेश पाठवत. या संदेशांमध्ये, तो त्याच्यावर रागावलेल्या विद्यार्थीनीला शांत करण्याचा प्रयत्न करत आहे.