मद्यपी कालरचालकाची धडक बेधडक रिक्षा, दुचाकीला ठोकरले
By Admin | Updated: July 31, 2015 22:25 IST2015-07-31T22:25:21+5:302015-07-31T22:25:21+5:30
शिरूर : शहरातून जाणार्या पुणे-अहमदनगर रस्त्यावर नगर परिषद प्रसूतिगृहासमोर एका मद्यपी मारुती कारचालकाने बेफामपणे कार चालवून एक रिक्षा व एका दुचाकीला धडक दिली. यात रिक्षाचालक जखमी झाला. एका बांधकामाच्या ठिकाणी रचलेल्या विटांच्या ढिगार्यात जाऊन धडकून कार जागेवरच थांबल्याने मोठी दुर्घटना टळली. नागरिकांना मात्र पुण्यात धुमाकूळ घातलेल्या संतोष मानेची आठवण झाली.

मद्यपी कालरचालकाची धडक बेधडक रिक्षा, दुचाकीला ठोकरले
श रूर : शहरातून जाणार्या पुणे-अहमदनगर रस्त्यावर नगर परिषद प्रसूतिगृहासमोर एका मद्यपी मारुती कारचालकाने बेफामपणे कार चालवून एक रिक्षा व एका दुचाकीला धडक दिली. यात रिक्षाचालक जखमी झाला. एका बांधकामाच्या ठिकाणी रचलेल्या विटांच्या ढिगार्यात जाऊन धडकून कार जागेवरच थांबल्याने मोठी दुर्घटना टळली. नागरिकांना मात्र पुण्यात धुमाकूळ घातलेल्या संतोष मानेची आठवण झाली.शहरातून जाणारा पुणे-नगर रस्ता खूप वर्दळीचा आहे. आज साडेसातच्या सुमारास कारचालक हनुमंत रासकर (रा. पिंपळनेर) विद्याधाम प्रशालेकडून वळून सतराकमानी पुलाकडे जाणार्या बाजूला चालला असता, मद्यधुंद असल्याने प्रथम त्याची धडक एका रिक्षाला बसली. तेथून तो शहरात रामआळीकडे जाणार्या रस्त्यावर वळाला. तेथे मुळे हॉस्पिटलजवळ उभ्या असलेल्या नव्या दुचाकीला त्याने उडवले. तेथून आदिनाथ क्लॉथ सेंटरसमोर असलेल्या एका विटेच्या ढिगार्याला जाऊन तो धडकला. तिथे उभ्या असलेल्या महिलेने अक्षरश: उडी मारली. यामुळे ती महिला बचावली. यादरम्यान नागरिकांची भिऊन पळापळ झाली. नागरिकांना संतोष माने याची आज आठवण झाली. रामआळी हा रस्ताही वर्दळीचा आहे. लहान मुलेही रस्त्यावर खेळत असतात. नागरिकांची सतत चहलपहल असते. अशात कार विटेच्या ढिगार्याला धडकली नसती, तर अनर्थ घडला असता. कार चालवताना चालकाच्या हातात दारूची बाटली होती व एका हाताने त्याने स्टिअरिंग धरले होते, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या घटनेमुळे घटनास्थळी मोठी गर्दी जमा झाली होती. उपस्थितांपैकी भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष मितेश गादिया, रामा झेंडे यांनी पोलिसांना कळविल्यावर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.कारचा फोटो मेल केला आहे.