डॉ. मनमोहनसिंग निवडणुकीच्या रिंगणात, राजस्थानमधून लढणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2019 15:54 IST2019-08-10T15:53:32+5:302019-08-10T15:54:00+5:30
डॉ. मनमोहनसिंग हे काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा राज्यसभेत पोहचण्याचे जवळपास निश्चित झाले आहे.

डॉ. मनमोहनसिंग निवडणुकीच्या रिंगणात, राजस्थानमधून लढणार
मुंबई - माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांना राजस्थान येथील राज्यसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार असतील. राजस्थान येथे होत असलेल्या राज्यसभेच्या जागेसाठी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली सिंह यांना उमेदवार बनविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी, 13 ऑगस्ट रोजी सिंग हे आपला अर्ज सादर करणार आहेत.
डॉ. मनमोहनसिंग हे काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा राज्यसभेत पोहचण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. पंतप्रधान असताना ते आसाममधून राज्यसभा सदस्य होते. 14 जून रोजी त्यांचा राज्यसभा सदस्यत्वाचा कार्यकाळ पूर्ण झाला होता. त्यामुळे, राज्यसभेत वापसी करण्यासाठी काँग्रेसने त्यांना राजस्थानमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष राहिलेले मदन लाल सैनी यांच्या निधनानंतर येथील जागा रिक्त झालेली आहे. दरम्यान, 26 ऑगस्ट रोजी येथील जागेसाठी निवडणूक होणार असून मतदानानंतर सायंकाळी विजयी उमेदवाराची घोषणा होईल.