चिनी स्मार्टफोन नकोय? सॅमसंगने स्वस्त Galaxy M01s लाँच केला; जाणून घ्या किंमत
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2020 15:28 IST2020-07-16T15:24:14+5:302020-07-16T15:28:35+5:30
Samsung Galaxy M01s रिअलमीच्या नझरो 10A आणि शाओमीच्या रेडमी 8 ला टक्कर देणार आहे.

चिनी स्मार्टफोन नकोय? सॅमसंगने स्वस्त Galaxy M01s लाँच केला; जाणून घ्या किंमत
नवी दिल्ली : दक्षिण कोरियाची कंपनी सॅमसंगने चीन विरोधी लाटेचा पुरेपुर फायदा उठविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे चीनच्या कंपन्यांना टक्कर देण्यासाठी सॅमसंगने 10000 हून कमी किंमतीचा स्मार्टफोन लाँच केला आहे. या फोनमध्ये मोठा डिस्प्ले, मोठी बॅटरी आणि 3 जीबी रॅम देण्यात आली आहे. हा फोन एकाच व्हेरिअंटमध्ये येत असून हा फोन रिअलमीच्या नझरो 10A आणि शाओमीच्या रेडमी 8 ला टक्कर देणार आहे. (Samsung Galaxy M01s)
फोनमध्ये 6.2 इंचाचा एचडी प्लस इंन्फिनिटी-ओ डिस्प्ले देण्यात आला आहे. स्क्रीन मोठी असल्याने व्हिडीओ आणि गेमिंगसाठी सोपा ठरणार आहे. तसेच हा स्मार्टफोन पातळ आहे. हा स्मार्टफोन दोन ग्लॉली रंग ब्ल्यू आणि ग्रेमध्ये येतो. सुरक्षेसाठी फोनमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर आणि फेस रेकग्निशन देण्यात आले आहे.
या फोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा आणि सिंगल सेल्फी कॅमेरा मिळतो. गॅलेक्सी M01s मध्ये 13 मेगापिक्सलचा प्रायमरी आणि 2 मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा देण्यात आला आहे. कॅमेरामध्ये लाईव्ह फोकसचे फिचर मिळते. यामुळे फोटोला आणखी क्रिएटिव्ह बनविता येते. सेल्फीसाठी यामध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
फोनमध्ये 4000 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. फोनमध्ये 3 जीबी रॅम आणि 32GB स्टोरेज मिळते. इंटरनल स्टोरेजमध्ये तुम्ही मायक्रोएसडी कार्डने 512 जीबी पर्यंत स्टोरेज वाढवू शकता. फोनमध्ये ऑक्टाकोअर MediaTek Helio P22 प्रोसेसर मिळतो. चांगल्या आवाजासाठी यामध्ये डॉल्बी अॅटमॉस टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. ग्राहक या फोनला रिटेल स्टोअर्स आणि अधिकृत वेबसाईटवर तसेच ई-कॉमर्स वेबसाइट्सवर खरेदी करू शकतात.
अन्य महत्वाच्या बातम्या...
कुठेय लॉकडाऊन; कुठेय मंदी! भारतातल्या सर्वांत महागड्या फ्लॅटची खरेदी; किंमत पाहून हादराल
Reliance AGM 2020: कोरोना लसीवर नीता अंबानींची मोठी घोषणा; इतिहासात पहिल्यांदाच भाषण
...तर 2 अब्जांनी पृथ्वीवरील लोकसंख्या कमी होईल; कोरोना महामारीनंतर मोठा इशारा
...तेव्हा सुशांत कुठे होता? मोदी भेटीवरून भाजपा खासदाराचा बॉलिवूडकरांना सवाल