शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
3
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
4
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
5
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
6
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
7
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
8
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
9
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
10
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
11
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
12
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
13
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
14
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
15
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
16
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
17
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
18
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
19
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत

आर्थिक मंदीची फार चर्चा करू नका; सरसंघचालकांचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2019 10:34 AM

देश मंदीच्या परिस्थितीतून बाहेर पडेल; भागवत यांना विश्वास

नागपूर: आर्थिक मंदीची फार चर्चा करू नका, असा सल्ला सरसंघचालक मोहन भागवत यांनी सर्वसामान्यांना दिला आहे. मंदीची फार चर्चा झाल्यास व्यापारी, व्यावसायिक बचावात्मक पवित्रा घेतील. त्यामुळे ते फारशी गुंतवणूक करणार नाहीत. याचा परिणाम पुन्हा अर्थव्यवस्थेवर होईल असं भागवत म्हणाले. सरकार अर्थव्यवस्थेला आलेली मरगळ दूर करण्यासाठी प्रयत्न करत असून देश लवकरच यातून बाहेर पडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सध्या देशाचा जीडीपी अवघ्या ५ टक्क्यांवर आला आहे. जीडीपी मोजण्याचे मानक दोषपूर्ण असल्याचं भागवत म्हणाले. जगातील अर्थव्यवस्थेत आलेली मंदी आणि अमेरिका-चीनमध्ये सुरू असलेल्या आर्थिक स्पर्धेचा फटका भारताला बसतो आहे. विकास दर शून्याच्या खाली गेला, तर मंदी आली असे म्हणतात. शासनाने या स्थितीतून बाहेर पडण्यासाठी दीड महिन्यात अनेक पावले उचलली आहेत. या मंदीच्या चक्रातून देश निश्चित बाहेर येईल, असा विश्वास सरसंघचालकांनी व्यक्त केला. अर्थव्यवस्थेला बळकटी आणण्यासाठी थेट विदेशी गुंतवणुकीला परवानगी देण्यासाठी सरकारला भूमिका घ्यावी लागली. सरकारची लोककल्याणकारी धोरणं व उपक्रम शेवटच्या घटकापर्यंत प्रभावी पद्धतीनं पोहोचावेत, यावर भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.जगातील प्रचलित मानक अनेक आर्थिक प्रश्नांचा उलगडा करत नाहीत. त्यामुळे आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला देशाच्या मूळांमध्ये जावे लागेल. सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग तसेच पर्यटन यावर भर द्यावा. उपलब्ध स्त्रोत व जनतेचा विचार करुन आर्थिक धोरणं तयार करायला हवीत. स्वदेशीचं विस्मरण झाल्यास त्यानं देशाचीच हानी होईल, असंही सरसंघचालकांनी म्हटलं. 

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतEconomyअर्थव्यवस्था