शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
4
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
5
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
6
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
7
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
8
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
9
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
10
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
11
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
12
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
13
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
14
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
15
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
16
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
19
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
20
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या

CBI, ED पाठवू नका, जर दोषी असेन तर फाशी द्या; ममता बॅनर्जींच्या भाच्याचं भाजपाला आव्हान

By जयदीप दाभोळकर | Published: January 07, 2021 6:40 PM

सात वर्षांत देशात कोणताही बदल न झाल्याचं म्हणत पंतप्रधानांवरही केली टीका

ठळक मुद्देआर्थिक सहभागी असल्याचं सिद्ध झाल्यास मला सार्वजनिक ठिकाणी फाशी द्या, अभिषेक बॅनर्जींचं वक्तव्यजीएसटी, नोटबंदीवरूनही पंतप्रधानांवर केली टीका

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा भाचा आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. जर आपण पैशांच्या गैरव्यवहाराचे दोषी आढळलो तर थेट मला फाशी द्या असं आव्हान त्यांनी भाजपाला दिलं. दक्षिण मिनाजपुर येथे एका निवडणुकीच्या सभेला संबोधित करताना त्यांनी भाजपावर हल्लाबोल केला. तसंच वेगवेगळ्या प्रकारानं मला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू असून थेट माझं नाव घेतलं जात नाही असंही ते म्हणाले. "ते माझ्यावर सातत्यानं टीका करत असतात. भाच्याला हटवा असं जबरदस्ती म्हणत असतात. मी यापूर्वीही सांगितलं होतं आणि आता कॅमेऱ्यांसमोर पुन्हा एकदा तेच सांगतोय. जर मी जबरदस्ती वसूली केल्याच्या प्रकरणात सामील आहे हे आणि मी कोणत्याही चुकीच्या कामात सहभागी आहे हे जर तुम्ही सिद्ध करू शकलात तर तुम्हाला ईडी आणि सीबीआय पाठवण्याची गरज नाही. सिद्ध झाल्यास सार्वजनिक ठिकाणी मला फाशी द्या. मी ते स्वीकारण्यास तयार आहे," असंही अभिषेक बॅनर्जी म्हणाले. सभेला संबोधित करताना अभिषेक बॅनर्जी यांनी भाजपाच्या नेत्यांना थेट नाव घेण्याचं आव्हान दिलं. यावेळी त्यांनी भाजपाचे महासचिव कैलाश विजयवर्गीय, त्यांचा मुलगा आकाश विजयवर्गीय यांचं नाव घेत त्यांना गुंड असं संबोधलं. "माझ्याविरोधात गुन्हा दाखल करा आणि मला तुरूंगात पाठवूनच दाखवा. त्यावेळी कोण खरं बोलतंय आणि कोण खोटं हे सिद्ध होईल," असंही ते म्हणाले. पंतप्रधानांवरही केली टीकायावेळी बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधला. "मोदींना पंतप्रधानपदी विराजमान होऊन ७ वर्ष झाली. परंतु देशात कोणतेही बदल घडले नाहीत. स्वत: दहा लाखांचे सूट घालायला लागले आणि महागड्या गाड्यांमध्ये फिरू लागले. परंतु ममता बॅनर्जी २०११ मध्ये मुख्यमत्री बनल्यापासून आजही साध्या साडीत आणि साध्या चपलांमध्ये असतात. त्या त्याच घरात राहतात ज्या घरात त्या पूर्वी राहायच्या. त्याच गाडीत प्रवास करतात ज्या गाडीत त्या पूर्वी करायच्या," असं बॅनर्जी म्हणाले. तसंच त्यांनी जीएसटी लागू करणं आणि नोटबंदीवरूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीtmcठाणे महापालिकाwest bengalपश्चिम बंगालBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीCBIगुन्हा अन्वेषण विभागEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय