शहरं
Join us  
Trending Stories
1
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
2
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
3
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं
4
मुंबईतील 'या' ठिकाणी लोक पैसे देऊन तासभर रडतात, प्रवेशासाठी होते गर्दी; काय आहे रुईकात्स?
5
Asia Cup 2025 : सिंग इज किंग! हरमनप्रीतची हॅटट्रिक; अखेरच्या टप्प्यात चीनचा करेक्ट कार्यक्रम
6
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
7
"मला माझ्या नवऱ्यापासून वाचवा..."; महिलेने कारमधून मारली उडी, रस्त्यावरच घातला गोंधळ
8
"नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका
9
चांद्रयान-5, तंत्रज्ञान , हायस्पीड रेल्वे अन् 10 ट्रिलियनची गुंतवणूक...भारत-जपानमध्ये १३ करार
10
सरिता हिची आत्महत्या नव्हेतर हत्याच... पती पुरुषोत्तम खानचंदानी यांचा आरोप
11
पंतप्रधान मोदींना जपानमध्ये मिळाली 'दारुम डॉल'; काय आहे या बाहुलीचा भारताशी संबंध?
12
"१९९१ मध्ये फसवणूक करूनच..."; सिद्धरामय्यांच्या एका विधानानं काँग्रेच्या 'मतचोरी' प्रकरणाची 'लंका' लावली; भाजपला मिळाला आयता मुद्दा!
13
राहुल गांधींना बदनाम करण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाईल; संजय राऊतांची टीका
14
मनोज जरांगे-पाटील यांना तात्काळ अटक करा; गुणरत्न सदावर्तेंची पोलीस महासंचालकांकडे मागणी
15
एअरपोर्टवर तरूणीच्या सामानाचं झालं 'चेकिंग'; पोलिसांनी बॅग उघडताच बसला धक्का.. आत काय निघालं?
16
बापरे! कच्च्या कांद्यामुळे आरोग्याचं मोठं नुकसान; समजल्यावर खाण्यापूर्वी कराल १०० वेळा विचार
17
'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा टीझर प्रदर्शित, वरुण धवन दिसला बाहुबली अवतारात
18
मुलीने बॉयफ्रेंडशी लग्नाचा तगादा लावला, बापाने लेकीचा आवाज बंद केला; मृतदेह लटकवून वेगळाच बनाव रचला 
19
ट्रम्प टॅरिफच्या संकटातही भारताची आर्थिक गाडी सुस्साट! GDP च्या वाढीत चीनलाही टाकलं मागे
20
पंक्चरचं दुकान अन् व्यवसायानं ड्रायव्हर; पंतप्रधान मोदींना शिवीगाळ करणारा तो' कोण?

Donald Trump's India Visit : अमेरिकन लोकांनी भारताविषयी 'या' गोष्टी केल्या गुगलवर सर्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2020 19:40 IST

Donald Trump's India Visit : ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याबाबत भारतीयांच्या मनात कुतुहल आहे. तसेच काहीसं कुतूहल हे अमेरिकेतील लोकांच्या मनात देखील आहे. 

ठळक मुद्देअमेरिकेतील लोकांनी भारत दौऱ्यासंदर्भातील अनेक गोष्टी या गुगलवर सर्च केल्या आहेत.अमेरिकेमध्ये 24 फेब्रुवारीला  'What Is India' आणि 'Where Is India' या दोन गोष्टी ट्रॉप ट्रेंडमध्ये होत्या.अमेरिकेतील लोकांनी नमस्तेचा अर्थ देखील शोधला आहे. 

नवी दिल्ली - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प यांचं जोरदार स्वागत केलं. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह त्यांच्या पत्नी मेलानिया आणि मुलगी इवांका ट्रम्प देखील भारताच्या दौऱ्यावर आल्या आहेत. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या बहुचर्चित भारत दौऱ्याला सुरुवात झाली आहे. ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याबाबत भारतीयांच्या मनात कुतुहल आहे. तसेच काहीसं कुतूहल हे अमेरिकेतील लोकांच्या मनात देखील आहे. 

अमेरिकेतील लोकांनी भारत दौऱ्यासंदर्भातील अनेक गोष्टी या गुगलवर सर्च केल्या आहेत. गेले दोन दिवस #DonaldTrumpIndiaVisit, #IndiaWelcomesTrump #DonaldTrump, #TrumpIndiaVisit यासारखे अनेक हॅशटॅग ट्रेंडींगमध्ये आहेत. डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पर्सनल लाइफबाबत जाणून घेण्यासाठी भारतीय नेटीझन्स प्रयत्नशील आहेत. डोनाल्ड ट्रम्प, त्यांची पत्नी आणि मुलगीबाबत भारतीयांकडून  मोठ्या प्रमाणात सर्च केले जात आहे. तर दुसरीकडे अमेरिकेतही भारताबद्दल अनेक गोष्टी सर्च करण्यात आल्या आहेत. 

अमेरिकेमध्ये 24 फेब्रुवारीला  'What Is India' आणि 'Where Is India' या दोन गोष्टी ट्रॉप ट्रेंडमध्ये होत्या. तेथील लोकांनी what is India? म्हणजेच भारत काय आहे? आणि where is India? म्हणजेच भारत नक्की कुठे आहे? या दोन गोष्टी सर्वाधिक सर्च केल्या आहेत. तसेच अहमदाबादच्या मोटेरा स्टेडिअममध्ये नमस्ते ट्रम्प या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यामुळे अमेरिकेतील लोकांनी नमस्तेचा अर्थ देखील शोधला आहे. 

25 फेब्रुवारीला अमेरिकेत भारताचा नकाशा, भारताची लोकसंख्या, ताजमहाल कुठे आहे?, भारताची राजधानी हे टॉपिक्स ट्रेंडींगमध्ये होते. भारतामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीचे नाव काय?, डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नीचे नाव काय?, इवांका यांचे वय किती आहे?, POTUS काय आहे ?, मेलानिया ट्रम्प यांचे वय किती आहे?,  डोनाल्ड ट्रम्प यांचे वय किती? हे प्रश्न सर्वाधिक सर्च करण्यात आले आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये मंगळवारी हैदराबाद हाऊसमध्ये द्विपक्षीय चर्चा झाली. ज्यात तीन अब्ज डॉलरच्या संरक्षण करारावर दोन्ही देशांच्या प्रमुखांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. दोन्ही जागतिक स्तरावरच्या नेत्यांनी एकसुरात दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या देशांवर निशाणा साधला. पाकिस्तानच्या जमिनीवरून पोसला जाणाऱ्या दहशतवादाला लगाम घालणं आवश्यक आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदी आणि दोन्ही देशांमधील मजबूत झालेल्या संबंधांचा उल्लेख केला आहे. भारताचा हा अभूतपूर्व दौराही कधी विसरणार नसल्याचं त्यांनी अधोरेखित केलं आहे. तसेच त्यांनी भारतीयांनी केलेल्या शानदार स्वागतासाठी आभारही व्यक्त केले आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या

Delhi Violence : दिल्लीत हिंसाचाराची धग कायम; 10 जणांचा मृत्यू, 150 जण जखमी

अमेरिका भारताला देणार '4G' सुरक्षा कवच; जाणून घ्या, काय आहे हे अस्त्र!

Donald Trump's India Visit : ट्रम्प यांच्या लेकीची शेरवानी 'या' मराठी डिझायनरने बनवली, पण...

Donald Trump Visit Live: भारत अमेरिकेतील संरक्षण करारावर शिक्तामोर्तब, ट्रम्प आणि मोदींची घोषणा

धक्कादायक! तब्बल 12 तास हायवेवर पडून असलेला मृतदेह हजारो गाड्यांनी चिरडला अन्...

 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पIndiaभारतAmericaअमेरिकाNarendra Modiनरेंद्र मोदीgoogleगुगल