VIDEO: पाळीव कुत्र्यावरुन शेजाऱ्याशी वाद; पती-पत्नीला लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2024 15:02 IST2024-05-16T15:02:35+5:302024-05-16T15:02:59+5:30

या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Dog and Pet Parent Attacked With Sticks By Neighbour In hyderabad | VIDEO: पाळीव कुत्र्यावरुन शेजाऱ्याशी वाद; पती-पत्नीला लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण

VIDEO: पाळीव कुत्र्यावरुन शेजाऱ्याशी वाद; पती-पत्नीला लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण

VIDEO: तेलंगणाची राजधानी हैदराबादमधून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये काही लोक आपला पाळीव कुत्रा घेऊन रस्त्यावर उभ्या असलेल्या एका व्यक्तीला लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण करताना दिसत आहेत. इतकंच नाही, तर त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी आलेल्या त्याच्या पत्नीलाही या लोकांनी बेदम मारहाण केली. तो पाळीव कुत्रा नेहमी अंगावर यायचा, या रागातून मारहाण झाल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार हैदराबादच्या रहमत नगर भागात ही घटना घडली आहे. एके श्रीनाथ असे पीडित व्यक्तीचे नाव आहे. श्रीनाथ अनेकदा आपला कुत्रा घेऊन परिसरा फिरायचा. त्याचा कुत्रा अनेकदा शेजाऱ्यांच्या घरात घुसायचा, रस्त्याने जाणाऱ्या लोकांना चावायला मागे धावायचा. यावरुन श्रीनाथचे परिसरात राहणाऱ्या धनंजय नावाच्या व्यक्तीशी वाद झाला. 

अखेर धनंजयचा संयम सुटला आणि त्याने त्याच्या दोन मित्रांच्या मदतीने श्रीनाथ आणि त्याच्या पत्नीला बेदम मारहाण केली. या मारहाणीदरम्यान परिसरातील इतर महिलांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. अखेर रस्त्यावर गर्दी जमल्याचे पाहून आरोपी तेथून पळून गेले.

Web Title: Dog and Pet Parent Attacked With Sticks By Neighbour In hyderabad