शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
3
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
4
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
5
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
6
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
7
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
8
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
9
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
10
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
11
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
12
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
13
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
14
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
15
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
16
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
17
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
18
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
19
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

दरोड्याचे प्रकरण

By admin | Updated: February 13, 2015 00:38 IST

१३ लाखांच्या दरोड्यातील आरोपीस

१३ लाखांच्या दरोड्यातील आरोपीस
अटकपूर्व जामीन नाकारला
नागपूर : कळमना भागातील सोनबानगर येथील महिंद्रा प्रोव्हिन्शियल ट्रॅक्टर शो-रूमवरील १३ लाखांच्या दरोड्यातील एका आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज तदर्थ न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. व्ही. दीक्षित यांच्या न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावला.
शेख अकबर ऊर्फ कालू शेख रेहमान (२४) असे आरोपीचे नाव असून, तो मेकोसाबाग येथील रहिवासी आहे.
प्रकरण असे, २१ ऑक्टोबर २०१४ रोजी पहाटे ३.१५ वाजताच्या सुमारास प्रभाकर हेडाऊ हा सुरक्षा रक्षक म्हणून तैनात असताना दरोडेखोरांनी पट्ट्याने त्याचे हातपाय बांधून महिंद्रा प्रोव्हिन्शियल ट्रॅक्टर शो-रूमवर दरोडा घातला होता. दरोडेखोरांनी आठ लाख रुपये रोख असलेली तिजोरी, चेकबुक, चांदीचे शिक्के, असा ऐवज लुटून नेला होता. त्यापैकी एचडीएफसी बँकेचा पाच लाखांचा एक चेक हिंगणा येथील सेंट्रल बँकेतील धर्मराज केणे याच्या खात्यात वळता करून वटविण्यात आला होता. हाच आधार घेत गुन्हे शाखा पोलिसांनी तपास करून मौद्याच्या कोदामेंढी येथे राहणाऱ्या रजत विनोद कोलते याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली होती. त्याने गुन्ह्याची कबुली दिली होती. त्याने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी आणखी पाच जणांना अटक केली होती. कोलते हाच या दरोड्याचा सूत्रधार निघाला होता. तो महिंद्रा कंपनीचा कमिशन एजंट होता. विकलेल्या ट्रॅक्टरचे पैसे त्याने हडप केले होते. शेख अकबर आणि अन्य एक या गुन्ह्यात फरार आहे. अटक टाळण्यासाठी अकबरने केलेला अर्ज फेटाळण्यात आला. न्यायालयात सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील अर्चना नायर यांनी काम पाहिले. या प्रकरणाचे तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक पी. एस. सानप हे आहेत.