एका डॉक्टरने लग्नाला अवघे काही महिने लोटल्यानंतर पत्नीची हत्या करून तिचा मृत्यू हा नैसर्गिक असल्याचं भासवल्याची आणि सुमारे सहा महिन्यानंतर त्याचं बिंग फुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत महिलासुद्धा डॉक्टर होती. तसेच त्यांच्या विवाहाला काही महिनेच झाले होते. मात्र या डॉक्टर पतीने अतिशय चालाखीने या महिलेची हत्या केली.
डॉ. कृतिका रेड्डी ह्या बंगळुरूमधील व्हिक्टोरिया रुग्णालयामध्ये त्वचारोगतज्ज्ञ होत्या. तर त्यांचे पती डॉ. महेंद्र रेड्डी हे याच रुग्णालयात जनरल सर्जन होते. कृतिका काही दिवसांपासून आजारी होती. त्यामुळे ती तिच्या वडिलांच्या घकरी वास्तव्यास आली होती. पती महेंद्र हा सुद्धा तिला भेटण्यासाठी येत असे. तसेच तो पत्नीची काळजी असल्याने तिला भेटायला येतोय, असं सर्वांना वाटायचं. पण प्रत्यक्षात वास्तव काही वेगळंच होतं.
डॉ. महेंद्र याने कृतिका हिला प्रकृती सुधारावी यासाठी दोन दिवस आयव्हीची इंजेक्शन दिली. मात्र २३ एप्रिल रोजी तिची तब्येत अधिकच बिघडली. तिला रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. त्यावेळी पोलिसांनी हा अनैसर्गिक मृत्यू असल्याची नोंद केली होती. त्यानंतर सहा महिन्यांनी फॉरेन्सिक रिपोर्टमधून धक्कादायक सत्य समोर आलं. या रिपोर्टमध्ये कृतिका हिच्या शरीरामध्ये प्रोपेफोल नाावाचं एनेस्थिशिया ड्रग्स सापडलं. हे औषध सर्वसामान्य ऑपरेशन थिएटरमध्ये रुग्णांना बेशुद्ध करण्यासाठी दिलं जातं. त्यामुळे कृतिका हिला हे औषध जाणीवपूर्वक देण्यात आल्याचे स्पष्ट झाले.
या सर्व प्रकाराबाबत कृतिका हिची बहीण डॉ. निकिता रेड्डी हिला सर्वप्रथम संशय आला. तिने आपल्या बहिणीचा मृत्यू नैसर्गिक नसल्याचा संशय व्यक्त केला. तिच्या सांगण्यावरूवन पोलिसांनी पुन्हा तपासाला सुरुवात केली. त्यानंतर कृतिका हिचा पती डॉ. महेंद्र आणि त्याच्या कुटुंबीयांविरोधात आधीपासूनच अनेक गुन्हे नोंद असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी डॉ. महेंद्र रेड्डी याला अटक केली. तसेच आता त्याने हा कट कसा रचला. तसेच मृत्यू हा नैसर्गिक मृत्यू असल्याचं भासवण्याचा प्रयत्न का केला. तसेच त्याने पत्नीची हत्या का केली, याची माहिती पोलीस घेत आहेत.
Web Summary : A doctor in Bangalore murdered his wife, also a doctor, and tried to pass it off as a natural death. Forensic reports revealed she was given anesthesia drugs, leading to the husband's arrest after six months of investigation.
Web Summary : बैंगलोर में एक डॉक्टर ने अपनी पत्नी, जो कि एक डॉक्टर भी थी, की हत्या कर दी और इसे प्राकृतिक मौत बताने की कोशिश की। फॉरेंसिक रिपोर्ट में खुलासा हुआ कि उसे एनेस्थीसिया दवाएं दी गई थीं, जिसके कारण छह महीने की जांच के बाद पति की गिरफ्तारी हुई।