शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
3
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
4
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
5
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
6
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
7
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
8
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
9
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
10
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
11
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
12
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
13
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
14
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
15
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
16
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
17
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
18
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
19
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
20
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र

डॉक्टरांनी सफाई कामगाराला करायला लावली प्रसूती, चुकीची नस कापल्याने नवजात बालकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2023 06:06 IST

Bihar News: पाटण्यातील दानापूर येथील एका नर्सिंग होममध्ये सफाई कामगाराकडून महिलेची प्रसूती डॉक्टरांनी व्हिडीओ कॉलद्वारे करून घेतली. एवढेच नाही, तर प्रसूतीनंतर बाळाची नाळ कापण्यास सांगितले. मात्र, चुकून दुसरी कापल्याने बालकाचा मृत्यू झाला.

पाटणा - बिहारची राजधानी पाटणा येथे एका नर्सिंग होममध्ये निष्काळजीपणामुळे एका नवजात बालकाचा जन्मानंतर मृत्यू झाला. पाटण्यातील दानापूर येथील एका नर्सिंग होममध्ये सफाई कामगाराकडून महिलेची प्रसूती डॉक्टरांनी व्हिडीओ कॉलद्वारे करून घेतली. एवढेच नाही, तर प्रसूतीनंतर बाळाची नाळ कापण्यास सांगितले. मात्र, चुकून दुसरी कापल्याने बालकाचा मृत्यू झाला. बालकाच्या मृत्यूनंतर संतप्त कुटुंबीयांनी गोंधळ घालत रुग्णालयाची तोडफोड केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी  सफाई कामगारासह रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना अटक केली. डॉक्टर मात्र अद्याप फरार आहे.

तरकारीया बाजार येथील रविशंकर यांची गर्भवती पत्नी ज्युली कुमारी हिला प्रसूती वेदना होत असल्याने तिला हर्षित पाली नर्सिंग होममध्ये दाखल करण्यात आले होते. दाखल करून घेतल्यानंतर डॉ. कांचन लता ज्युलीला सफाई कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली सोडून कुठेतरी गेल्या. यादरम्यान महिलेला तीव्र प्रसूती वेदना झाल्या आणि तिची नॉर्मल प्रसूती झाली.

याची माहिती मिळताच डॉक्टरांनी सफाई कामगार सुनीता आणि कर्मचाऱ्यांना व्हिडीओ कॉलद्वारे मूल कसे जन्माला येते हे सांगितले. परंतु, अनुभव नसल्याने त्यांनी नवजात बालकाची चुकीची नस कापली.

टॅग्स :Biharबिहारdocterडॉक्टर