शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
3
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
4
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
5
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
6
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
7
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
8
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
9
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
10
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
11
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
12
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
13
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
14
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
15
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
16
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
17
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
18
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
19
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
20
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 

...तर विषाणूचे आणखी नवे प्रकार उत्पन्न होऊ शकतात; डॉक्टरांनी दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2021 1:55 PM

अपुऱ्या लसीकरणामुळे विषाणूचे आणखी नवे प्रकार उत्पन्न होऊ शकतात, असा इशाराही डॉक्टरांनी दिला.

नवी दिल्ली : कोरोनाची बाधा झालेल्या व त्यातून बरे झालेल्यांना लस देण्याची आवश्यकता नाही, असे सार्वजनिक आरोग्य या विषयातील तज्ज्ञ डॉक्टरांनी पंतप्रधानांना दिलेल्या अहवालात म्हटले आहे. 

अपुऱ्या लसीकरणामुळे विषाणूचे आणखी नवे प्रकार उत्पन्न होऊ शकतात, असा इशाराही डॉक्टरांनी दिला. टास्क फोर्समधील सदस्य, एम्सचे डॉक्टर, इंडियन पब्लिक हेल्थ असोसिएशन, इं. असोसिएशन ऑफ प्रिव्हेंटिव्ह अँड सोशल मेडिसीन, असो. ऑफ पिडेमिऑलॉजिस्टसच्या तज्ज्ञांनी अहवाल बनविला आहे.

आवश्यकता असलेल्यांनाच लस द्या-

लहान मुलांसह सर्वांना लस देण्याऐवजी ज्यांना खरंच आवश्यकता आहे त्यांनाच ही लस देण्यात यावी.  पोलिओ किंवा इतर लसी देण्याच्या मोहिमांमधील अनुभव कोरोना लसीकरण मोहीम राबविताना उपयोगी ठरतील, असेही डॉक्टरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सादर केलेल्या एका अहवालात म्हटले आहे.

तरुणांना लस देणे किमतीच्या दृष्टीने न परवडणारे-

डॉक्टरांनी म्हटले आहे की, लसींचा तुटवडा पाहता वयोवृद्ध, स्थूलपणा वा एकाहून अधिक सहव्याधींनी ग्रस्त असलेल्यांमध्ये कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण कमी करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. तरुणांना लस देणे किमतीच्या दृष्टीने परवडणारे नाही. डेल्टा प्रकाराचा संसर्ग असलेल्या भागात कोविशिल्डच्या २ डोसचे १२ आठवड्यांचे अंतर घटवण्याचा विचार करावा.

देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ८४ हजार ३३२ नवे रुग्ण-

देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव आता हळूहळू कमी होताना दिसत आहे. देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ८४ हजार ३३२ नवे रुग्ण आढळले आहेत. देशातील एकूण कोरोना रुग्णांचा आकडा आता २,९३,५९,१५५ वर पोहोचला आहे. तर गेल्या २४ तासांत देशात ४,००२ जणांचा कोरोनानं मृत्यू झाला आहे. एकूण मृत्यूमुखींचा आकडा आता ३ लाख ६७ हजार ०८१ वर पोहोचली आहे. देशात सध्या १० लाख ८० हजार ६९० सक्रिय कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याdocterडॉक्टर