शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

आर्थिक प्रभाव पडणारे निर्णय घेऊ नका उच्च न्यायालयाचा मांझी सरकारला आदेश

By admin | Updated: February 16, 2015 21:12 IST

पाटणा- बिहारमधील राजकीय संकट लक्षात घेता पाटणा उच्च न्यायालयाने राज्यातील जितन राम मांझी सरकारला दैनंदिन व्यवहारवगळता आर्थिक प्रभाव टाकणारे कुठलेही निर्णय घेऊ नका, असे आदेश सोमवारी दिले.

पाटणा- बिहारमधील राजकीय संकट लक्षात घेता पाटणा उच्च न्यायालयाने राज्यातील जितन राम मांझी सरकारला दैनंदिन व्यवहारवगळता आर्थिक प्रभाव टाकणारे कुठलेही निर्णय घेऊ नका, असे आदेश सोमवारी दिले.
न्यायमूर्तीद्वय इकबाल अहमद आणि समरेंद्र प्रतापसिंग यांच्या खंडपीठाने विधान परिषदेतील संयुक्त जनता दलाचे सदस्य नीरजकुमार यांच्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना उपरोक्त आदेश दिला. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता १९ फेब्रुवारीला होईल. याचिकेत मुख्यमंत्र्यांशिवाय राज्याचे मुख्य सचिव, राज्यपालांचे प्रधान सचिव आणि मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिवांना प्रतिवादी बनविण्यात आले आहे.
कुमार यांचे वकील आणि माजी महाधिवक्ता पी.के. साही यांनी अल्पमतातील मांझी सरकारतर्फे घेतल्या जात असलेल्या धोरणात्मक निर्णयांकडे न्यायालयाचे लक्ष वेधले होते.
मांझी सरकारने ७० लाख रुपयांपर्यंतच्या कंत्राटात अनुसूचित जाती जनजातीच्या कंत्राटदारांना प्राधान्य, मोफत पोषाख आणि सायकल योजनेचा लाभ घेण्यासाठी सामान्य आणि आरक्षित वर्गाकरिता शाळेतील उपस्थितीची टक्केवारी ७५ वरून कमी करून अनुक्रमे ६० व ५५ टक्के करणे आणि पाच एकरपर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोफत वीज आदी निर्णय घेतले आहेत.
शाही यांनी त्यांच्या युक्तिवादात उत्तर प्रदेशच्या जगदंबिका पाल सरकारबाबत सर्वोच्च न्यायालयाने घेतलेल्या निर्णयाचाही हवाला दिला. तर आपण याप्रकरणी आपल्या अशिलासोबत विचारविनिमय करू, असे मांझी यांचे वकील एस.पी.के. मंगल यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)