शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

पुढील सुनावणीपर्यंत रोहिंग्यांना परत पाठवू नका, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला आदेश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2017 16:23 IST

देशाची सुरक्षा आणि आर्थिक हितसंबंधांचे रक्षण करणे आवश्यक आहे. मात्र पीडित महिला आणि मुलांकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असे निरीक्षण नोंदवत सर्वोच्च न्यायालयाने पुढील सुनावणीपर्यंत रोहिंग्या निर्वासितांना माघारी धाडू नका...

नवी दिल्ली - देशाची सुरक्षा आणि आर्थिक हितसंबंधांचे रक्षण करणे आवश्यक आहे. मात्र पीडित महिला आणि मुलांकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असे निरीक्षण नोंदवत सर्वोच्च न्यायालयाने पुढील सुनावणीपर्यंत रोहिंग्या निर्वासितांना माघारी धाडू नका, असे आदेश केंद्र सरकारला शुक्रवारी दिले. तसेच सर्व पक्षांना आपापली भूमिका मांडण्याचे आदेश देत या प्रकरणाची पुढील सुनावणी  सर्वोच्च न्यायालयाने २१ नोव्हेंबरपर्यंत स्थगित केली आहे. रोहिंग्या निर्वासितांना भारतातून माघारी धाडण्याच्या भारत सरकारने घेतलेल्या निर्णयाविरोधात रोहिंग्या निर्वासितांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. रोहिंग्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील तीन सदस्यीय खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे. या खंडपीठामध्ये सरन्यायाधीशांव्यतिरिक्त न्यायमूर्ती एएम खानविलकर आणि न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांचा समावेश आहे. या प्रकरणावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने या मुद्द्याबाबतच्या विविध पैलूंवर सुनावणी करण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच मात्र केंद्र सरकाराने प्रतिज्ञापत्र दाखल करून हा प्रश्न कार्यकारी मंडळाचा असून, सर्वोच्च न्यायालयाने त्यात हस्तक्षेप करू नये, अशी भूमिका घेतली होती. केंद्र सरकारने आपल्या शपथपत्रात रोहिंग्या निर्वासित हे देशाच्या सुरक्षेसाठी धोका असल्याचे त्यांना भारतात ठेवता येणार नाही, असे स्पष्ट केले आहे. तसेच मिळालेल्या गुप्त सूचनेनुसार काही रोहिंग्या निर्वासित दहशतवादी संघटनांच्या संपर्कात असल्याची माहितीही सर्वोच्च न्यायालयात दिली होती. मात्र या प्रकरणाची सुनावणी भावनात्मक मुद्यांवर नाही तर कायदेशीर मुद्यांवरून व्हायला हवी असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.    दरम्यान, म्यानमारमध्ये सुरु असलेल्या दंगली व जाळपोळीच्या सत्राला कंटाळून भारतात येण्याच्या तयारीत असणा-या रोहिंग्यांना रोखण्यासाठी भारताने कडक पावले उचलली आहेत. एेजाॅल, सर्चिप आणि लुंगेई येथे आसाम रायफल्सच्या तीन तुकड्या तैनात केल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिका-याने दिली. एकाही रोहिंग्याला भारतात घुसता येऊ नये यासाठी मिझोरम आणि म्यानमार सीमेवर पहारा देण्यात येत आहे. आसाम रायफल्सच्या इतर पाच तुकड्या ही घुसखोरी रोखण्यासाठी आसाम, मणिपूर आणि नागालॅडमध्ये तैनात केल्याची माहिती या पोलिसाने दिली आहे.

टॅग्स :Rohingyaरोहिंग्याSupreme Courtसर्वोच्च न्यायालयIndiaभारतGovernmentसरकार