करु नको म्हटले की ‘तो’ करणारच

By Admin | Updated: August 26, 2015 23:32 IST2015-08-26T23:32:32+5:302015-08-26T23:32:32+5:30

या जुळ्या बहीण-भावांमध्ये ‘तो’ आहे खोडकर. कुठलीही गोष्ट करू नको म्हटले की ती हमखास करणारच. अभ्यासापेक्षा याचे खेळण्याकडेच जास्त लक्ष असते. ‘ती’ मात्र शांत स्वभावाची, अभ्यासात हुशार आणि कलेमध्ये आवड असलेली.

Do not say that 'he' will do it | करु नको म्हटले की ‘तो’ करणारच

करु नको म्हटले की ‘तो’ करणारच

जुळ्या बहीण-भावांमध्ये ‘तो’ आहे खोडकर. कुठलीही गोष्ट करू नको म्हटले की ती हमखास करणारच. अभ्यासापेक्षा याचे खेळण्याकडेच जास्त लक्ष असते. ‘ती’ मात्र शांत स्वभावाची, अभ्यासात हुशार आणि कलेमध्ये आवड असलेली.
सोलापुरात मुरारजी पेठेतील हजरत खान चाळ येथे राहणारे व व्यवसाय करणारे जमील अय्युब खान व नुसरत जमील खान यांची जैद व अरसीन ही जुळी मुले. यांच्या घरात जैद-अरसीनचे काका व आत्या हे जुळे असून यांचे चुलत बहीण-भाऊ देखील जुळे आहेत.
24 नोव्हेंबर 2001 ही जैद व अरसीन यांची जन्मतारीख. एसएसए न्यू इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेत दोघेही इयत्ता नववीमध्ये आहेत. शाळेत दोघेही एकाच वर्गात. अभ्यासात अरसीन ही पुढे असते. जैदला व्हॉलीबॉलची आवड तर अरसीनला बॅडमिंटन, चित्रकलेमध्ये रस. चित्रकलेमध्ये तिला पुरस्कारदेखील मिळाला आहे. वाचन, लिहिण्याचीही तिला आवड आहे. घर तिला टापटीप पाहिजे असते आणि त्यासाठी ती स्वत: लक्ष देत असते. तस्मिया ही यांची लहान बहीण पाचवीमध्ये आहे.
4संजय द. शिंदे


‘ब्रेन्डन ट्विन्स’
अमेरिकन अभिनेता निकोलस ब्रेन्डन हा जुळ्यांपैकीच एक आहे. केली डोनोव्हन हे त्याच्या जुळ्या भावाचे नाव आहे. 12 एप्रिल 1971 रोजी यांचा जन्म झाला.

Web Title: Do not say that 'he' will do it