शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

महाआघाडीला घाबरु नका, जिंकण्याची माझी जबाबदारी - अमित शहा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2018 4:07 PM

2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी आतापासून सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे.

नवी दिल्ली : 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी आतापासून सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे. भारतीय जनता पार्टीच्या (भाजपा) उत्तरप्रदेशातील कार्यसमितीच्या बैठकीचा आजचा दुसरा आणि शेवटचा दिवस आहे. या बैठकीसाठी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा उपस्थित होते. यावेळी भाजपा नेत्यांना 2014 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा मंत्र अमित शहा यांनी दिल्याचे सांगण्यात येते. 

महाआघाडीला घाबरण्याची गरज नाही. निवडणूक जिंकण्याची माझी जबाबदारी आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत गेल्या निवडणुकीपेक्षा जास्त जागा जिंकायच्या आहेत. त्यामुळे केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील योगी सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहचविण्याचे काम तुम्ही सर्वांनी करा, असे अमित शहा यांनी या बैठकीत पार्टीच्या नेत्यांना सांगितले असल्याची माहिती सुत्रांकडून समजते. दरम्यान, उत्तरप्रदेशातील मेरठ पश्चिमेकडील मोठे राजकीय केंद्र आहे. याठिकाणी 12 वर्षांनंतर भाजपच्या प्रदेश कार्यसमितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. याआधी कानपूर, मिर्जापूर, चित्रकूट आणि लखनऊमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

(देशात मुदतीआधी लोकसभा निवडणूक होणार नाही- अमित शहा)

(बांगलादेशी घुसखोरच तृणमूल काँग्रेसची व्होटबँक; ममता बॅनर्जी यांच्यावर अमित शहा यांची जोरदार टीका)

अमित शहा यांनी काल कोलकाता येथे भाजपच्या युवा मोर्चाद्वारे आयोजित केलेल्या युवा स्वाभिमान सभेमध्ये बांगलादेशी घुसखोरीवरुन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला होता. यावेळी ते म्हणाले, भाजपा बंगाल विरोधी नसून ममता विरोधी आहे. आमच्या पक्षाची सुरुवातच बंगालच्या शामा प्रसाद मुखर्जी यांनी केली, मग भाजपा पश्चिम बंगाल विरोधी कसा होईल, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. संसदेमध्ये नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन (एनआरसी) वर चर्चा होत असताना ममता त्याला विरोध करत होत्या. आसाममधील घुसखोरांना खड्यासारखे निवडून बाजुला करण्यात येणार आहे. ममता यांच्या विरोधामुळे ही प्रक्रिया थांबणार नाही. ममता कोणत्या उद्देशाने बांगलादेशी घुसखोरांना छत्रछाया देत आहेत. काँग्रेसनेही याबाबत आपली भुमिका स्पष्ट करावी, असे आव्हान यावेळी अमित शहा यांनी केले. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहUttar Pradeshउत्तर प्रदेशBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी