सरकारचं दिवाळी गिफ्ट; आशा कार्यकर्त्यांना मिळणार दुप्पट फायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2019 15:34 IST2019-10-09T15:32:43+5:302019-10-09T15:34:29+5:30

केंद्र सरकारनं आशा कार्यकर्त्यांना गुड न्यूज दिली आहे.

Diwali Gift of Government; asha workers will get double the benefit | सरकारचं दिवाळी गिफ्ट; आशा कार्यकर्त्यांना मिळणार दुप्पट फायदा

सरकारचं दिवाळी गिफ्ट; आशा कार्यकर्त्यांना मिळणार दुप्पट फायदा

नवी दिल्लीः केंद्र सरकारनं आशा कार्यकर्त्यांना गुड न्यूज दिली आहे. आशा कार्यकर्त्यांच्या मानधनात केंद्रानं दुप्पट वाढ केली आहे. पहिल्यांदा त्यांना हजार रुपये मानधन मिळत होतं, त्याऐवजी आता त्यांना 2 हजार रुपये मानधन मिळणार आहे. आशा कार्यकर्त्या या प्रामुख्यानं महिला असतात, त्या ग्रामीण भागातील लोकांना आरोग्याची सुविधा पुरवितात. हा भत्ता जुलै 2019पासून लागू झाला असून, लवकरच तो त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती दिली आहे.

जावडेकरांनी शेतकऱ्यांना दिलासा देत सांगितलं की, शेतकरी 30 नोव्हेंबरपर्यंत किसान सन्मान निधीसाठी आधार नंबर देऊ शकतात. पहिल्यांदा ही तारीख ऑगस्ट 2019 होती. या निधीअंतर्गत सरकार छोट्या शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपयांची आर्थिक मदत करते. तर दुसरीकडे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली आहे. याचा लाभ केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना मिळणार आहे. सरकारकडून महागाई भत्त्यात 5 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे दिवाळीआधीच सरकारी कर्मचाऱ्यांना गिफ्ट मिळालं आहे. मोदी सरकारनं केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 5 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. याआधी महागाई भत्त्यात केवळ 2 ते 3 टक्क्यांनी वाढ व्हायची. मात्र मोदी सरकारनं महागाई भत्ता 5 टक्क्यांनी वाढवल्याचं जावडेकर म्हणाले. सध्या केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना 12 टक्के महागाई भत्ता मिळतो. आता तो 17 टक्क्यांवर गेला आहे. 

Web Title: Diwali Gift of Government; asha workers will get double the benefit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.