शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीतून फुटली संवादाची कोंडी !

By admin | Updated: September 20, 2014 01:59 IST

‘युती ठेवायचीच’ ही रूपरेषा केंद्रीयमंत्री नितीन गडकरी व पंतप्रधान मोदी यांच्या दुपारी झालेल्या भेटीतून ठरली तर त्यामुळे शिवसेना-भाजपा युतीमधील संवादाची कोंडी अखेर दिल्लीतून फुटली.

रघुनाथ पांडे - नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मध्यस्तीनंतर भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी भाजपानेते एकनाथ खडसे व सुधीर मुनगंटीवार यांना शिवसेनेशी चर्चेची सुरूवात करण्यास सांगितले. ‘युती ठेवायचीच’ ही रूपरेषा केंद्रीयमंत्री नितीन गडकरी व पंतप्रधान मोदी यांच्या दुपारी झालेल्या भेटीतून ठरली तर त्यामुळे शिवसेना-भाजपा युतीमधील संवादाची कोंडी अखेर दिल्लीतून फुटली.  
   सेना-भाजपाच्या वादात मोदी या वादात मध्यस्तीकरतील असे मानले जात होते. पण भाजपाध्यक्ष अमित शहा स्वत: निवडणुकीचे प्रभारी ओमप्रकाश माथुर महाराष्ट्राच्या दौ:यावर होते. त्यामुळे तेच हा विषय निकाली काढतील असे वाटत होते. तथापि, शिवसेनेने ताठर भूमिका घेतल्याने चर्चेचा मार्ग निघत नव्हता. 
  सूत्रंनी सांगितले की, आज सकाळी पंतप्रधान मोदी यांनी युतीचा काडीमोड विरोधकांसाठी लाभदायी ठरू शकतो. तेव्हा दोन पाऊल मागे या, असे शहा यांना सांगितले. त्यामुळे शहा यांनी राज्यातील नेत्यांना सेनेसोबत चर्चा करण्याचे फर्मान सोडले.
 पण तरीही दुपारी दोनर्पयत कोणताच निर्णय पक्षाकडून होत नव्हता. त्यातच मुंबईला पूवर्नियोजित दोन कार्यक्रमांसाठी निघालेले नितीन गडकरी यांनी पंतप्रधानांची भेट घेतल्याबरोबर मुंबईला जाण्याचे रद्द केले. त्या्मुळे युती तुटण्याची चर्चा शिगेला पोचली. गडकरी खरोखरच आजारी आहेत का,याची चाचपणी करणारे शेकडो फोन कार्यालयात धडकू लागले. मुळात, परवा मुंबईतील भाजपाची बैठक आटोपून गडकरी दिल्लीत पोचल्यावर त्यांना सर्दी - पडशे झाले. आज सकाळी बील गेट्स त्यांच्या घरी आले तेव्हाही ते अस्वस्थच होते. त्यामुळे मुंबईतील कार्यक्रम रद्द करून ते विमानतळावरुनच  घरी पोहोचले. त्यामुळे दुपारनंतरच्या घडामोडीत गडकरींचा सहभाग कुठच नव्हता.