डिझेल चोरी केल्यामुळं विवस्त्र करुन बदडले, व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2017 20:10 IST2017-08-17T20:06:00+5:302017-08-17T20:10:14+5:30

महामार्ग विकासासाठी काम करणाऱ्या एका कंपनीमध्ये डिझेल चोरी केल्याचा आरोप करत एका व्यक्तीला विवस्त्र करुन रस्त्यावर बदडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Diesel stolen, damaged due to theft, video viral | डिझेल चोरी केल्यामुळं विवस्त्र करुन बदडले, व्हिडिओ व्हायरल

डिझेल चोरी केल्यामुळं विवस्त्र करुन बदडले, व्हिडिओ व्हायरल

नवी दिल्ली, दि. 17 - महामार्ग विकासासाठी काम करणाऱ्या एका कंपनीमध्ये डिझेल चोरी केल्याचा आरोप करत एका व्यक्तीला विवस्त्र करुन रस्त्यावर बदडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. छत्तीसगड राज्यातील बिलासपूर कोरबा येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे. येथील दिलीप बिल्डकॉन कंपनीच्या एका आधिकाऱ्यानं डिझेल चोरी केल्याच्या आरोपाखाली एका व्यक्तीला तालिबान्यासारखी अमानुष्य शिक्षा केली. भररस्त्यावर त्या तरुणाला विवस्त्र करुन लाकडाच्या दांड्यानं बेदम मारले आहे.

दिलीप बिल्डकॉन कंपनीमध्ये काम करणाऱ्या श्याम नावाच्या व्यक्तीवर डिझेल चोरी केल्याचा आरोप ठेवत अधिकाऱ्यानं त्याला बेदम मारलं आहे. श्यामच्या अंगावरील सर्व कपडे उतरवून दिवसाठवळ्या रस्त्यावर त्याला अमानुष्य मारघान केली. ही घटना पाच दिवसांपूर्वीची आहे. पण सोशल मीडियावर याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण समोर आल आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिस या प्रकरणांचा तपास घेत आहेत.

ज्याप्रमाणे तातिबानीमध्ये शिक्षा केली जाती तसं भररस्त्यावर श्यामला विवस्त्र करुन मारलं जात होतं, त्यावेळी लोक चूपचाप गप्प पहात होते. काही जणांनी त्या घटनेचा व्हिडिओ घेण्यात धन्यता मानली. पण येवढ्या मोठ्या गर्दीतून एकाचीही माणूसकी झाली नाही. दिलेश शर्मा आणि अखिलेश सिंह या दोन आधिकाऱ्यांनी श्यामला मारहान केल्याचे व्हिडिओतून स्पष्ट दिसत आहे. या घटनेचा तपास करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, याबद्दल कोणतीही तक्रार आलेली नाही. सोशल मीडिायावर व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या साह्यानं आम्ही या घटनेचा तपास करत आहोत. त्यानुसार गुन्हेगाराविरोधात कारवाई केली जाईल.

( आणखी वाचा : मद्यधुंद अवस्थेतच ‘ते’ दोघे दरीत पडले, आंबोली घटनेचा व्हिडिओ व्हायरल )

Web Title: Diesel stolen, damaged due to theft, video viral