शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

Fuel Price Hike: “कल्याणकारी योजना राबवण्यासाठीच पैसे वाचवतोय”: धर्मेंद्र प्रधान

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2021 8:37 PM

Fuel Price Hike: केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या टीकेला उत्तर देत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही निशाणा साधला आहे.

ठळक मुद्देधर्मेंद्र प्रधान यांचा राहुल गांधींवर निशाणाआम्ही पैसे वाचवून लोक कल्याणाच्या कामात लावले - प्रधानदेशात रोजागार निर्मितीसाठी विकासकामे होण्यासाठी गुंतवणुकीची आवश्यकता - प्रधान

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात होत असलेली वाढ सर्वसामान्य नागरिकांसाठी डोके वाढवणारी ठरत आहे. एकीकडे कोरोना संकटामुळे उद्योग, व्यवसाय बंद होऊन बेरोजगारीचे प्रमाण वाढत असताना दुसरीकडे मात्र सातत्याने होणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमुळे देशवासी हैराण झाल्याचे पाहायला मिळत आहेत. देशातील काही ठिकाणी पेट्रोलनंतर आता डिझेलच्या दराने शंभरी ओलांडली आहे. यावरून काँग्रेस तसेच अन्य विरोधी पक्षांकडून केंद्रातील मोदी सरकारवर टीका करण्यात येत आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या टीकेला उत्तर देत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही निशाणा साधला आहे. (dharmendra pradhan asks rahul gandhi must answer why fuel prices are high in congress ruled states)

मुंबईत पेट्रोलच्या दराने शंभरी ओलांडल्यानंतर आता राजस्थानमधील श्रीगंगानगर भागात डिझेलच्या दरांनी शंभरी गाठली आहे. तरीही पेट्रोलियम कंपन्यांकडून एक दिवसाआड इंधनदरवाढ सुरूच आहे. यावर देशभरातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. यावर बोलताना धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, होय मला मान्य आहे की, या संकटाच्या काळात इंधनाचे दर वाढल्यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. मात्र, केंद्र किंवा राज्य सरकारची सुमारे ३५ हजार कोटींपेक्षा अधिक रक्कम कोरोना लसीकरणासाठी वर्षभरात खर्च होणार आहे, असे प्रधान म्हणाले. 

“होय, आताच्या घडीला भाजपला सशक्त पर्याय नाही”; कपिल सिब्बल यांची कबुली

कल्याणकारी योजनांसाठी पैसे वाचवतोय

कोरोना संकटाच्या काळात एक लाख कोटी रुपये खर्च करून पंतप्रधानांनी आठ महिन्यांसाठी मोफत धान्य देण्यासाठी, पंतप्रधान गरीब कल्याण योजना सुरू केली आहे. पीएम किसान योजनेद्वारे हजारो कोटी रुपये देशातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट पोहोचवले आहेत. मी याच वर्षातील खर्चाबाबत बोलत आहे, असे प्रधान यांनी स्पष्ट केले. 

राहुल गांधींवर टीकास्त्र

देशात रोजागार निर्मितीसाठी विकासकामे होण्यासाठी गुंतवणुकीची आवश्यकता भासत आहे. या काळात, आम्ही पैसे वाचवून लोक कल्याणाच्या कामात लावले. जर राहुल गांधींना गरिबांबद्दल एवढीच कळवळ चिंता आहे, तर त्यांना आपले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आदेश द्यावा. मुंबईत सर्वांत महाग पेट्रोल यामुळे आहे. महाराष्ट्राचा कर देशात सर्वांत जास्त आहे. राजस्थानचा कर पेट्रोलवर सर्वात जास्त आहे, अशी टीका धर्मेंद्र प्रधान यांनी यावेळी बोलताना केली.

“नाना पाटोलेंना मुख्यमंत्री, राहुल गांधींना वाटतंय पंतप्रधान व्हावसं, पण...”; भाजपचा टोला

दरम्यान, पेट्रोल-डिझेलचे दर अद्याप कमी करता येणार नाहीत, असे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या अगोदरच स्पष्ट केले असून, सरकारचे उत्पन्न कमी आहे आणि खर्च जास्त आहे. त्यामुळे इंधन दर आता कमी करता येणार नाहीत, असे ते म्हणाले होते.  

टॅग्स :Fuel Hikeइंधन दरवाढCentral Governmentकेंद्र सरकारUddhav Thackerayउद्धव ठाकरेRahul Gandhiराहुल गांधीPoliticsराजकारण