Dhanbad Fire: धनबादमध्ये अग्नितांडव, अपार्टमेंटमध्ये लगलेल्या आगीत 9 जणांचा मृत्यू, अनेक जण अडकले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2023 22:28 IST2023-01-31T22:25:34+5:302023-01-31T22:28:05+5:30
मिळालेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत 20 हून अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत. 15 लोकांना वाचवण्यात यश आले आहे. तसेच अजूनही लोकांना रेस्क्यू करण्यात येत आहे.

Dhanbad Fire: धनबादमध्ये अग्नितांडव, अपार्टमेंटमध्ये लगलेल्या आगीत 9 जणांचा मृत्यू, अनेक जण अडकले
झारखंडमधील धनबाद येथे एका अपार्टमेंटमध्ये मंगळवारी भीषण आग लागली. ही आग जोडाफाटक येथील आशीर्वाद आपर्टमेंटच्या तिसऱ्या मंजल्यावर लागली आहे. बरेच लोक अपार्टमेंटमध्ये अडकून पडले आहेत. या दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त असून अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. येथे बचावकार्य सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत 20 हून अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत. 15 लोकांना वाचवण्यात यश आले आहे. तसेच अजूनही लोकांना रेस्क्यू करण्यात येत आहे.
झारखंड: धनबाद में जोराफाटक रोड स्थित आशीर्वाद टावर के पास आग लगी। मौके पर दमकल की गाड़ियां मौजूद हैं। अधिक जानकारी की प्रतीक्षा है। pic.twitter.com/rJNrvKUdDM
— ANI_HindiNews (@AHindinews) January 31, 2023
यापूर्वी पश्चिम बंगालची राजधानी असलेल्या कोलकात्यात एका गोदामाला आग लागली होती. यावेळी अग्निशमन दलाच्या 12 गाड्यांनी घटनास्थळी पोहोचत आग आटोक्यात आणली होती. अग्निशमन सेवेचे संचालक अभिजीत पांडे म्हणाले, अग्निशमन दलाच्या गाड्या तैनात करण्यात आल्या आहेत. आगीवर नियंत्रम मिळविण्यात आले आहे. ही आग पहिल्याच मजल्यावरील बुटांच्या एका दिकानात लागली आहे. काही लोक या आगीत अडकले होते. मात्र त्यांना वाचविण्यात आले आहे. यात कुणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.
याशिवाय, उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनौमध्येही बादशाह नगर मेट्रो स्टेशनवरील ई-रिक्शा गोदामाला आग लागली. लखनौचे डीएम सूर्यपाल गंगवार म्हणाले, बॅटरीचे काम सुरू असलेल्या खोलीत आग लागली. या आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले आहे. यात जी व्यक्ती बॅटरीच्या दुकानात काम करत होती ती जखमी झाली होती. तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. बाकी इतर सर्व लोकांना रेस्क्यू करण्यात आले आहे. ही आग कशामुळे लागली. याची चोकशी करण्यात येणार आहे.