शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
3
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
4
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
5
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
6
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
7
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
8
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
9
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
10
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
11
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
12
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
13
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
14
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
15
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
16
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
17
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
18
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
19
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
20
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
Daily Top 2Weekly Top 5

हत्येप्रकरणी डेरा सच्चा सौदा प्रमुखाची मुक्तता; पंजाब-हरयाणा उच्च न्यायालयाचा निकाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2026 06:18 IST

२००२मध्ये एका पत्रकाराच्या हत्या प्रकरणात डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरमीत राम रहीम सिंग याची पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.

चंडीगड : २००२मध्ये एका पत्रकाराच्या हत्या प्रकरणात डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरमीत राम रहीम सिंग याची पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. ही माहिती त्याचे वकील जितेंद्र खुराना यांनी शनिवारी दिली. न्यायालयाने डेरा प्रमुखाला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर सात वर्षांहून अधिक कालावधीनंतर त्यांची निर्दोष मुक्तता केली. पंजाब व हरयाणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश शील नागू यांच्या अध्यक्षतेखालील उच्च न्यायालयाच्या विभागीय खंडपीठाने शनिवारी पत्रकार रामचंद्र छत्रपती यांच्या हत्या प्रकरणात गुरमीत राम रहीम सिंग याची निर्दोष मुक्तता केली असे खुराना यांनी सांगितले. मात्र, या प्रकरणातील इतर तीन आरोपींची शिक्षा खंडपीठाने कायम ठेवली आहे. डेरा प्रमुख सध्या रोहतक येथील सुनारिया तुरुंगात आहे. २०१७मध्ये दोन महिला शिष्यांवर बलात्कार केल्याप्रकरणी सुनावलेली २० वर्षांची शिक्षा तो सध्या भोगत आहे.

अशी आहे पत्रकाराच्या हत्येची कहाणी

सिरसा येथील डेरा मुख्यालयात महिलांवर लैंगिक शोषण होत असल्याचा उल्लेख असलेले एक अनामिक पत्र रामचंद्र छत्रपती यांच्या ‘पूरा सच’ या वृत्तपत्रात प्रकाशित झाल्यानंतर ऑक्टोबर २००२मध्ये छत्रपती यांच्यावर त्यांच्या घराबाहेर गोळीबार करण्यात आला होता.त्यांचा गंभीर जखमी झाल्याने मृत्यू ओढवला. या प्रकरणात राम रहीम याच्यावर हत्येचा कट रचल्याचा आरोप ठेवून गुन्हा दाखल झाला.  रामचंद्र छत्रपती यांचे पुत्र अंशुल यांनी सांगितले की, पंजाब व हरयाणा उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात येईल. 

  •  
English
हिंदी सारांश
Web Title : Dera Sacha Sauda Chief Acquitted in Murder Case by High Court

Web Summary : Gurmeet Ram Rahim Singh acquitted in 2002 journalist murder case. Punjab & Haryana High Court overturned prior conviction. Other accused's sentences upheld. Victim's son to appeal to Supreme Court.
टॅग्स :Punjabपंजाब