शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकाचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
2
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
3
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
4
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
5
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
6
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
7
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
8
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
9
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
10
१ लाखाचे बनले १.७० कोटी रुपये, आता 'हा' आहे देशातील सर्वात महागडा शेअर
11
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
12
“संविधान हाच राष्ट्रधर्म, इंदू मिल स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करणार”: DCM एकनाथ शिंदे
13
इराणच्या अणुबॉम्बचा कच्चा माल रशियाच्या हाती? महासत्तांमध्ये रस्सीखेच सुरू; अमेरिका जप्त करण्याच्या तयारीत
14
VIDEO: काव्या मारनला सर्वांसमोर कुणी दिला गुलाब? SRHच्या विजयानंतर घडला किस्सा
15
पाकिस्तानला जमलं नाही ते जिनपिंग करून दाखवणार? इराण-अमेरिका युद्ध थांबवण्यासाठी चीनचे ४ महाफॉर्म्युले!
16
IPL च्या पदार्पणातच दमदार कामगिरी; पहिल्या सामन्यासाठी प्रफुल हिंगेला किती मिळाली सॅलरी?
17
Royal Enfield: रॉयल एनफील्डची सर्वात महागडी बाईक; किंमत ऐकून थक्क व्हाल, तेवढ्यात तर येईल आलिशान कार!
18
Vastu Shastra: रोज दाराबाहेर रांगोळी काढता? त्यामुळे होणारे लाभ वाचून रांगोळीची सवय लावून घ्याल!
19
हृदयद्रावक! अमेरिकेत २६ वर्षीय भारतीय तरुणासोबत आक्रित घडलं; वाढदिवशीच झाला मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीच्या चार पोलिसांविरुद्ध विभागीय चौकशी

By admin | Updated: May 7, 2014 02:17 IST

दोन गटात हाणामारीप्रकरणी तीन युवकांना अटक करून बेदम मारहाण केल्याचा आरोप असलेल्या दिल्लीच्या चार पोलिसांविरुद्ध विभागीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

नवी दिल्ली : दोन गटात हाणामारीप्रकरणी तीन युवकांना अटक करून बेदम मारहाण केल्याचा आरोप असलेल्या दिल्लीच्या चार पोलिसांविरुद्ध विभागीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दक्षिण दिल्लीच्या आर.के. पुरम पोलीस ठाण्यातील सहायक उपनिरीक्षक मनोजकुमार, कॉन्स्टेबल मोहितकुमार आणि कॉन्स्टेबल परमवीर यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. तत्पूर्वी, चार युवकांना कथित मारहाण करणार्‍या पोलिसांविरुद्ध कारवाई करण्याच्या मागणीसाठी स्थानिकांनी पोलीस ठाण्यासमोर निदर्शने केली. एकता विहारमध्ये रविवारी रात्री दोन गटात हाणामारी झाली. याप्रकरणी चार युवकांना अटक करून बेदम मारहाण केल्याचा आरोप पोलिसांवर आहे. आरोपी पोलिसांना पोलीस लाईनमध्ये पाठविण्यात आले असून, त्यांच्याविरुद्ध चौकशी सुरू आहे, असे एक पोलीस अधिकारी म्हणाले. पोलीस चौकशीत दोषी आढळून आल्यास त्यांना निलंबित करण्यात येईल. दोन गटात हाणामारी झाल्यानंतर पोलिसांनी रविवारी रात्री प्रदीप, सलीम, नोनी आणि साजन यांना अटक केली. हे सर्व विशीतील युवक आहेत. (वृत्तसंस्था)