शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकाचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
2
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
3
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
4
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
5
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
6
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
7
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
8
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
9
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
10
१ लाखाचे बनले १.७० कोटी रुपये, आता 'हा' आहे देशातील सर्वात महागडा शेअर
11
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
12
“संविधान हाच राष्ट्रधर्म, इंदू मिल स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करणार”: DCM एकनाथ शिंदे
13
इराणच्या अणुबॉम्बचा कच्चा माल रशियाच्या हाती? महासत्तांमध्ये रस्सीखेच सुरू; अमेरिका जप्त करण्याच्या तयारीत
14
VIDEO: काव्या मारनला सर्वांसमोर कुणी दिला गुलाब? SRHच्या विजयानंतर घडला किस्सा
15
पाकिस्तानला जमलं नाही ते जिनपिंग करून दाखवणार? इराण-अमेरिका युद्ध थांबवण्यासाठी चीनचे ४ महाफॉर्म्युले!
16
IPL च्या पदार्पणातच दमदार कामगिरी; पहिल्या सामन्यासाठी प्रफुल हिंगेला किती मिळाली सॅलरी?
17
Royal Enfield: रॉयल एनफील्डची सर्वात महागडी बाईक; किंमत ऐकून थक्क व्हाल, तेवढ्यात तर येईल आलिशान कार!
18
Vastu Shastra: रोज दाराबाहेर रांगोळी काढता? त्यामुळे होणारे लाभ वाचून रांगोळीची सवय लावून घ्याल!
19
हृदयद्रावक! अमेरिकेत २६ वर्षीय भारतीय तरुणासोबत आक्रित घडलं; वाढदिवशीच झाला मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

विजय मल्ल्यांना पाठवण्यास नकार

By admin | Updated: May 12, 2016 04:04 IST

मनी लाँड्रिंगच्या आरोपाचा सामना करीत असलेले मद्यसम्राट विजय मल्या यांना हद्दपार करून भारतात पाठविण्यास ब्रिटनने स्पष्ट नकार दिला आहे.

नवी दिल्ली : मनी लाँड्रिंगच्या आरोपाचा सामना करीत असलेले मद्यसम्राट विजय मल्या यांना हद्दपार करून भारतात पाठविण्यास ब्रिटनने स्पष्ट नकार दिला आहे. तथापि मल्ल्यांचे प्रत्यार्पण करण्याच्या भारताच्या विनंतीवर आपण विचार करू शकतो, असे ब्रिटनने म्हटले आहे. मल्ल्यांना भारतात परत आणण्यासाठी त्यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आल्यानंतर प्रत्यार्पण प्रक्रियेची सुरुवात करण्यात येणार असल्याचे वित्तमंत्री अरुण जेटली यांनी बुधवारी राज्यसभेत सांगितले.मल्ल्यांना हद्दपार करून भारतात पाठविण्यात यावे, अशी विनंती भारत सरकारने पंधरा दिवसांपूर्वी ब्रिटनला केली होती. मात्र ब्रिटनने भारतात बुधवारी उत्तर दिले. मल्ल्यांचा भारतीय पासपोर्ट रद्द करण्यात आला आहे. तसेच त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंटही जारी करण्यात आला आहे.‘१९७१ च्या इमिग्रेशन अ‍ॅक्टअंतर्गत जर एखाद्या व्यक्तीजवळ ब्रिटनमध्ये प्रवेश करतेवेळी वैध पासपोर्ट असेल तर देशात वास्तव्य करतानादेखील त्या व्यक्तीजवळ वैध पासपोर्ट असलाच पाहिजे याची ब्रिटनला आवश्यकता वाटत नाही, असे ब्रिटन सरकारने आम्हाला सांगितले आहे. सोबतच ब्रिटनने मल्ल्यांविरुद्धच्या आरोपांचे गांभीर्य मान्य केले आहे आणि भारत सरकारची मदत करण्याची इच्छा जाहीर केली आहे. परस्पर कायदेशीर सहकार्य किंवा प्रत्यार्पणाच्या भारताच्या विनंतीवर आपण विचार करू शकतो, असे ब्रिटनने सांगितले आहे,’ अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी दिली. १९९३ मध्ये भारत आणि ब्रिटन यांच्यादरम्यान प्रत्यार्पण करार झाला होता. या कराराअंतर्गत आता मल्ल्यांचे प्रत्यार्पण केले जाऊ शकते.मल्ल्यांना भारतात आणण्यासाठी आता आरोपपत्र दाखल करण्यात आल्यानंतर प्रत्यार्पणाची प्रक्रिया प्रारंभ करण्यात येईल, असे अरुण जेटली यांनी राज्यसभेत सांगितले. ते म्हणाले की, एखाद्या व्यक्तीने वैध पासपोर्टच्या आधारावर ब्रिटनमध्ये प्रवेश केला असेल आणि नंतर त्याचा पासपोर्ट रद्द करण्यात आला असेल तरीदेखील त्या व्यक्तीला हद्दपार केले जाऊ शकत नाही, असे ब्रिटनने भारताला कळविले आहे.