टेंभुर्णीतील बा‘वळण मार्गावर भुयारी मार्गाची मागणी

By Admin | Updated: June 25, 2015 23:51 IST2015-06-25T23:51:06+5:302015-06-25T23:51:06+5:30

टेंभुर्णी : येथील बा‘वळण महामार्गावर तीन ठिकाणी भुयारी मार्ग करण्याची मागणी शिवसेनेचे माढा तालुका उपप्रमुख मधुकर देशमुख यांनी जिल्हाधिकारी व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे निवेदनाद्वारे केली आहे़

Demand for subway on the west side of Tribhuhan | टेंभुर्णीतील बा‘वळण मार्गावर भुयारी मार्गाची मागणी

टेंभुर्णीतील बा‘वळण मार्गावर भुयारी मार्गाची मागणी

ंभुर्णी : येथील बा‘वळण महामार्गावर तीन ठिकाणी भुयारी मार्ग करण्याची मागणी शिवसेनेचे माढा तालुका उपप्रमुख मधुकर देशमुख यांनी जिल्हाधिकारी व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे निवेदनाद्वारे केली आहे़
टेंभुर्णी येथील बा‘वळण महामार्गाचे काम सुरू असून, प्रस्तावित मार्गावर कोठेही भुयारी मार्ग ठेवण्यात आलेला नाही़ या बा‘वळण मार्गावर रस्ता ओलांडून जुने बसस्थानक ते कन्हेरगाव, करमाळा चौक ते सुर्ली व भवानी मंदिर ते निमगाव या ठिकाणी जावे लागते़ मात्र यापैकी एकाही ठिकाणी भुयारी मार्ग केला नाही़ त्यामुळे या मार्गावरुन ये-जा करणार्‍यांची गैरसोय होते़ परिणामी या मार्गावर मोठे अपघात होण्याची शक्यता आहे़ त्यामुळे या बा‘वळण मार्गावर भुयारी मार्ग असणे गरजेचे असल्याचे मधुकर देशमुख यांनी सांगितले़
यावेळी आरपीआयचे जिल्हा उपाध्यक्ष जयवंत पोळ, शिवसेना शहर उपप्रमुख संतोष खैरमोडे, किशोर नाळे, जावेद तांबोळी, साहिल तांबे, प्रदीप कांबळे, प्रशांत सोनवणे उपस्थित होते़ (वार्ताहर)

Web Title: Demand for subway on the west side of Tribhuhan