आल्हाददायक : देशात यंदा पाऊस वेळेवर आणि भरपूर!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2020 06:11 AM2020-04-16T06:11:36+5:302020-04-16T06:11:44+5:30

कोरोनामुळे हवालदिल झालेल्या देशवासीयांसाठी हवामान खात्याची शुभवार्ता

Delightful: Timely and plenty of rain this year in the country! | आल्हाददायक : देशात यंदा पाऊस वेळेवर आणि भरपूर!

आल्हाददायक : देशात यंदा पाऊस वेळेवर आणि भरपूर!

googlenewsNext

नवी दिल्ली : कोरोनाच्या भीषण संकटाने देश हवालदिल झालेला असतानाच यंदा नैऋत्य मोसमी पाऊस भारतात ठरल्यावेळी येईल आणि भरपूर कोसळेल, अशी शुभवार्ता हवामान खात्याने बुधवारी दिली. यामुळे समस्त देशवासीय विशेषत: शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
साधारणपणे ७ जूनला पावसाला सुरुवात होणाºया महाराष्ट्रात मात्र केरळहून निघालेला पाऊस पोहोचायला तीन ते सात दिवसांचा उशीर होऊ शकेल, असेही म्हटले आहे. हवामान खाते पावसाचे दीर्घकालीन अंदाज एप्रिल व जून असे दोन वेळा वर्तविते. ‘लॉकडाउन’मुळे प्रत्यक्ष पत्रकार परिषद न घेता भूविज्ञान खात्याचे सचिव डॉ. एम. राजीवन व हवामान खात्याचे महासंचालक डॉ. एम. मोहपात्रा यांनी आॅनलाइन ब्रीफिंग घेत यंदाचे पहिले भाकीत जाहीर केले. यंदा नैर्ऋत्य मोसमी पाऊस ठरल्या वेळी म्हणजे येत्या १ जून रोजी भारतीय उपखंडाच्या अगदी दक्षिणेकडे केरळ किनाºयावर दाखल होईल व त्यानंतर सप्टेंबरपर्यंतच्या चार महिन्यांत देशभर दीर्घकालीन सरासरीच्या १०० टक्के म्हणजे भरपूर पाऊस पडेल, असा अंदाज त्यांनी जाहीर केला.

३ ते ७ दिवसांचा विलंब
केरळमध्ये वेळेवर आला तरी देशांतर्गत भागात तो थबकत थबकत विलंबाने पसरतो असा अनुभव आहे. त्यानुसार महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगण, आंध्र प्रदेश, ओदिशा, झारखंड, बिहार व उत्तर प्रदेशच्या काही भागांत पावसाच्या आगमनाला तीन ते सात दिवसांचा विलंब होऊ शकेल. राजस्थानच्या काही भागात मात्र तो अपेक्षित तारखेहून आठवडाभर लवकर म्हणजे ८ जूनपर्यंतच पोहोचेल.

असा येईल
पाऊस
पुणे १० जून
मुंबई ११ जून
अहमदनगर १२ जून
सातारा १२ जून
कोल्हापूर १२ जून
जळगाव १३ जून
नागपूर १५ जून

Web Title: Delightful: Timely and plenty of rain this year in the country!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.