शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

Delhi Violence : दिल्लीतील हिंसाचाराची आग थांबेना, मृतांचा आकडा पोहोचला सातवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2020 12:52 IST

Delhi Violence News : मंगळवारी अनेक आंदोलक हे रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळाले. आंदोलकांकडून पाच दुचाकी पेटवून देण्यात आल्या व दगडफेक देखील करण्यात आली आहे.

ठळक मुद्देदिल्ली हिंसाचारातील मृतांचा आकडा सातवर पोहचला आहे. मंगळवारी अनेक आंदोलक हे रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळाले.आंदोलकांकडून पाच दुचाकी पेटवून देण्यात आल्या व दगडफेक देखील करण्यात आली.

नवी दिल्ली - दिल्लीतील सीएए विरोधी आंदोलनाला सोमवारी (24 फेब्रुवारी) हिंसक वळण लागलं आहे. या आंदोलनात पुन्हा एकदा दगडफेक करण्यात आली. तसेच दिल्लीतील गोकुलपुरी भागात आंदोलनादरम्यान गोळीबार करण्यात आला. यामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्यासह सात जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. दिल्लीतील काही भागांमध्ये उफाळलेल्या हिंसाचारात सोमवारी तब्बल 37 पोलीस गंभीर जखमी झाले होते. तर पाच जणांचा मृत्यू झाला होता. मात्र मंगळवारी मृतांचा आकडा सातवर पोहचला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी देखील अनेक आंदोलक हे रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळाले. आंदोलकांकडून पाच दुचाकी पेटवून देण्यात आल्या व दगडफेक देखील करण्यात आली आहे. भजनपुरा, मौजपूरमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. हेड कॉन्स्टेबल रतन लाल यांचा यामध्ये मृत्यू झाला. तर डीसीपी अमित शर्मा हे जखमी झालेत. जखमी पोलिसांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार,  नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ आणि विरोधावरुन दिल्लीत सोमवारी (24 फेब्रुवारी) तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. सीएए विरोधी आंदोलनात आज पुन्हा दगडफेक करण्यात आली असून यामध्ये एका हेड कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत. गोकुलपुरी भागात आंदोलनादरम्यान गोळीबार करण्यात आला. पेट्रोल पंप आणि काही गाड्या पेटवण्यात  आल्या आहेत. परिस्थिती नियंत्रणासाठी अश्रू धुरांच्या नळकांड्या फोडण्यात आल्या आहेत. दिल्लीतील परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी निमलष्करी दलाच्या तुकड्या रवाना करण्यात आल्या आहेत. पोलिसांची संख्या अपूर्ण असल्याने निमलष्करी दलाच्या जवानांना तैनात करण्यात येणार आहे.

सीएएविरोधातील आंदोलनातून दिल्लीत हिंसाचार पेटला आहे. उत्तर पूर्व दिल्लीमध्ये परिस्थिी नियंत्रणाबाहेर गेली असून लोकांना तुम्ही हिंदू आहे की मुस्लीम? असा प्रश्न विचारण्यास सुरुवात झाली आहे. धार्मिक आधारावर मारहाण, हिंसाचार पेटवला जात आहे. असाच धक्कादायक प्रकार दिल्लीतील हिंसाचारादरम्यान घडला. टाइम्स ऑफ इंडियाचा फोटोग्राफर ज्यावेळी मौजपूर मेट्रो स्टेशनला पोहचला, त्यावेळी एक हिंदू सेनेचा सदस्य त्यांच्याजवळ येऊन फोटोग्राफरच्या कपाळावर टिळा लावला. आता तुमचं काम सोप्प होईल, तुम्ही हिंदू आहात मग याने काय नुकसान होणार असं त्या व्यक्तीने फोटोग्राफरला सांगितले. जवळपास १५ मिनिटानंतर परिसरात दोन गटांमध्ये दगडफेकीला सुरुवात झाली. यादरम्यान काही ठिकाणी जाळपोळ करण्यात आली. फोटोग्राफर आग लागलेल्या ठिकाणी जायला लागला त्यावेळी त्याला काही लोकांनी शिवमंदिराजवळ थांबवलं. मी फोटो घेण्यास जात आहे असं सांगितल्यानंतरही त्यांनी परवानगी दिली नाही. त्यावेळी तुम्ही हिंदू आहात, कशाला पुढे जाताय? असं विचारण्यात आलं.

आंदोलकांनी नेमौजपूर भागात दोन घरेही पेटवली आहेत. पोलिसांना जमावाला पांगवण्यासाठी अश्रू धुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या आहेत. सीएएच्या समर्थकांनी आणि विरोधकांनी एकमेकांवर दगडफेक सुरू केल्याने तणाव निर्माण झाला आहे. रविवारी देखील सीएए विरोधी आंदोलनात दगडफेक झाली होती. सीएएच्या निषेधार्थ जाफराबादमध्ये मोठ्या संख्येने महिला जमा झाल्या होत्या. मात्र कायद्याच्या समर्थनार्थ भाजपा नेते कपिल मिश्रा यांच्या नेतृत्वात मौजपूर चौकाजवळ लोक जमा झाले. त्याचवेळी मौजपूरमधील कबीर नगर मेट्रो स्थानकाजवळ सीएएच्या समर्थक आणि विरोधकांमध्ये दगडफेक झाली. दगडफेकीमुळे संपूर्ण परिसरात तणाव निर्माण झाला होता. 

महत्त्वाच्या बातम्या

Delhi Violence: बंदुकधारी तरुण भाजपा समर्थक नाहीच, जाणून घ्या सत्य

Delhi Violence: तू हिंदू आहेस की मुसलमान?; दिल्ली हिंसाचारात पत्रकाराला विचारला प्रश्न, मग...

दंगेखोरांनी छातीवर रोखली पिस्तूल, तरीही मागे हटला नाही पोलीस कॉन्स्टेबल

'राजधानी को बचाना ही होगा', हिंसाचारानंतर दिल्लीत शाळा बंद अन् परीक्षाही रद्द

किस्सा कुर्सी का; व्यासपीठावराच्या दोन खुर्च्यांमधून मोदींनी दिला मोठा संदेश

 

टॅग्स :delhiदिल्लीPoliceपोलिसDeathमृत्यूstone peltingदगडफेक