Donald Trump Visit: किस्सा कुर्सी का; व्यासपीठावराच्या दोन खुर्च्यांमधून मोदींनी दिला मोठा संदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2020 01:32 AM2020-02-25T01:32:38+5:302020-02-25T06:50:13+5:30

नमस्ते ट्रम्प : पंतप्रधानपदाची शक्ती व प्रसिद्धी सारखीच असल्याचे दाखवले

Donald Trump Visit: Modi delivered a big message by placing only two chairs on the platform | Donald Trump Visit: किस्सा कुर्सी का; व्यासपीठावराच्या दोन खुर्च्यांमधून मोदींनी दिला मोठा संदेश

Donald Trump Visit: किस्सा कुर्सी का; व्यासपीठावराच्या दोन खुर्च्यांमधून मोदींनी दिला मोठा संदेश

Next

- संतोष ठाकूर 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी कुशल राजकीय मुत्सद्दी असल्याचे उगाच नाही कोणी म्हणत. अहमदाबादेत मोटेरा स्टेडीयमवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड जे. ट्रम्प यांच्या स्वागतासाठी सोमवारी आयोजित ‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रमात व्यासपीठावर दोन पाहुणे व एक यजमान होते. परंतु, तेथे फक्त दोनच खुर्च्या होत्या. ते पाहून फक्त तेथील लोकच अचंब्यात पडले, असे नाही तर त्या आधी कार्यक्रमाशी संबंधित अधिकारीही या निर्णयावर आश्चर्य व्यक्त करीत होते. त्यांना हे सांगण्यात आले होते की, व्यासपीठावर फक्त दोनच खुर्च्या ठेवल्या जाव्यात. या मागे नरेंद्र मोदी यांचीच रणनीती होती. ते त्यांचे चाहते व लोकांना हा संदेश देऊ इच्छित होते की ट्रम्प व त्यांच्यात कोणतेही अंतर नाही. त्यांची खुर्ची तीच आहे जी ट्रम्प यांची. त्यांचा संदेश त्यांच्या चाहत्यांसाठी स्पष्ट होता की, पंतप्रधानपदाची शक्ती व प्रसिद्धी कोणत्याही नेत्यापेक्षा कमी नाही. याच कारणामुळे अमेरिकेचे अध्यक्षही त्यांच्यासोबत खुर्ची शेअर करायला तयार झाले. जगातील बहुतेक देश या प्रकारचा विचारही करू शकत नाहीत.

अधिकाऱ्यांनुसार खुर्च्यांचे राजकीय कारण काहीही असेल. परंतु, मुत्सद्देगिरीचे कारण अवश्य होते. दोन राष्ट्रप्रमुख जेव्हा भेटतात तेव्हा त्यांच्या खुर्च्या शेजारी-शेजारी लावल्या जातात. परंतु, येथे व्यासपीठावर तीन जण होते. त्यात डोनाल्ड ट्रम्प, त्यांची पत्नी मेलेनिया होते. या परिस्थितीत प्रश्न होता की, खुर्ची कशी लावली जावी. ट्रम्प यांना मधोमध बसवले जावे आणि त्यांच्या दोन्ही बाजुंना दोन खुर्च्या (मोदी व मेलेनिया ट्रम्प यांच्यासाठी) लावल्या जाव्यात. परंतु, यातून हा संदेश अजिबात जात नव्हता की, दोन्ही नेते एक सारखे आहेत. कारण मध्यभागी बसलेली व्यक्तीच प्रमुख असते. याशिवाय समाज माध्यमांवर डाव्या व उजव्या हाताला बसवल्यावर नव्या टीका सुरू होतात. म्हणून दोनच खुर्च्या लावल्या जाव्यात, असे ठरले. एक नेता बोलत असताना दुसरा नेता त्याच्या जागी बसेल. यातून खुर्चीची ही कथा आपोआपच संपून जाते. यातकाही जण राजनैतिक डावपेच बघत असले तरी अधिकृतरित्या काही सांगता येणार नाही.

पंतप्रधान मोदींना अमेरिका भेटीचे ट्रम्प यांचे निमंत्रण
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या भारत दौºयाच्या पहिल्या दिवशी सोमवारी अहमदाबादेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना अमेरिकेला येण्याचे निमंत्रण दिले. मोदी यांनी ते स्वीकारले. मोदी तिकडे अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीच्या आधी जातात का ही उत्सुकता आहे.
अमेरिकेत मोठ्या संख्येने भारतीय लोक असून त्यांच्यावर्र मोदी यांचा मोठा प्रभाव आहे. मोदी जर अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या आधी तिकडे गेले तर रिपब्लिकन पक्ष त्यांच्या आगमनाचा लाभ करून घेण्याचा प्रयत्न करील.

ट्रम्प यांचा हा भारत दौरा रिपब्लिकन पक्षाच्या निवडणूक प्रचाराशी जोडून पाहिला जात आहे. ह्यूस्टनमध्ये ज्या प्रकारे ‘हौडी मोदी’ कार्यक्रमात मोदी यांची लोकप्रियता सिद्ध झाली होती तसा लाभ रिपब्लिकन पक्ष येत्या नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या निवडणुकीत घेऊ इच्छितो. मोदी यांनी ह्यूस्टनमध्ये घोषणा केली होती की, ‘अब की बार फिर से ट्रम्प सरकार’ यामुळे रिपब्लिकन पक्ष मोठ्या उत्साहात होता.
पंतप्रधान कार्यालयाशी संबंधित अधिकारी म्हणाला की ट्रम्प यांनी मोदी यांना अमेरिका भेटीचे निमंत्रण दिले. ट्रम्प त्यांचेही असेच मोठे स्वागत करतील. अहमदाबादेत झालेल्या स्वागताने ट्रम्प फारच आनंदी होते.

Web Title: Donald Trump Visit: Modi delivered a big message by placing only two chairs on the platform

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.