Delhi Violence : 'त्या' माऊलीने दोन मुलींसह पहिल्या मजल्यावरून घेतली उडी; कारण वाचून हादराल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2020 19:31 IST2020-02-28T19:27:16+5:302020-02-28T19:31:10+5:30

Delhi Violence : या घटनेमुळे मायलेकींवर खूप मोठा परिणाम झाल्याचे अहमद यांनी सांगितले.

Delhi Violence: 'That' mother jumped from the first floor with two girls; if you read reason you will be shocked! pda | Delhi Violence : 'त्या' माऊलीने दोन मुलींसह पहिल्या मजल्यावरून घेतली उडी; कारण वाचून हादराल!

Delhi Violence : 'त्या' माऊलीने दोन मुलींसह पहिल्या मजल्यावरून घेतली उडी; कारण वाचून हादराल!

ठळक मुद्देईशान्य दिल्लीतील अल-हिंद हॉस्पिटलमध्ये 45 वर्षीय महिलेने ही आपबिती सांगितली आहे.  जमावाने त्याच्या पाठीवर एक केमिकल ओतले त्यामुळे त्याची त्वचा जळाली. दंगेखोरांच्या जमावाने महिलांची छेडछाड करत त्यांचे कपडे देखील फाडल्याच्या धक्कादायक घटना दिल्लीत घडल्या आहेत.

नवी दिल्ली -  CAA वरून दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत आगडोंब उसळला असून एका आईने आपबिती सांगितली आहे. छेडछाडीपासून बचाव करण्यासाठी या माऊलीने दोन मुलींसह अंगाला ओढणी बांधून पहिल्या मजल्यावरून उडी मारून पळ काढला आणि दंगेखोरांपासून सुटका मिळवली.  ईशान्य दिल्लीतील अल-हिंद हॉस्पिटलमध्ये 45 वर्षीय महिलेने ही आपबिती सांगितली आहे. 

Delhi Violence : आतापर्यंत १२३ गुन्हे दाखल अन् ६३० जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात

 

दंगेखोरांच्या जमावाने महिलांची छेडछाड करत त्यांचे कपडे देखील फाडल्याच्या धक्कादायक घटना दिल्लीत घडल्या आहेत. करावल नगरमध्ये स्वयंसेवी संस्था चालवणाऱ्या महिलेने डोळ्यात अश्रू आणत सांगितले की, “जमावाने आत प्रवेश केला तेव्हा मी घरी होते. मी आणि माझ्या दोन मुलींचा विनयभंग केला आणि आमचे कपडे जमावाने फाडले.” नंतर जमावाने त्यांचा पाठलाग केला. परंतु ते थांबले आणि शेवटी कुठे गायब झाले. नंतर त्या मायलेकींनी किराणा दुकानातील मालक अयूब अहमद यांच्या घरी आश्रय घेतला.

"जेव्हा आम्ही अहमदच्या घरी पोहोचलो तेव्हा त्याने आम्हाला जेवण व इतर आवश्यक वस्तू दिल्या आणि नंतर आम्हाला अल हिंद रुग्णालयात दाखल केले. तेथे मी आमच्या परिसरातील रहिवाशांना ओळखले होते." असं पुढे त्या म्हणाल्या. या घटनेमुळे मायलेकींवर खूप मोठा परिणाम झाल्याचे अहमद यांनी सांगितले.

हिंसाचारग्रस्त ईशान्य दिल्लीत सशस्त्र जमावांनी हल्ला केल्यावर गेल्या काही दिवसांपासून अल-हिंद हॉस्पिटलमध्ये आणलेल्या अनेकांपैकी ही एक महिला आहे. प्रत्येकाशी निगडित हिंसाचाराच्या  भयानक अनुभव आहेत. करवल नगर येथे राहणारा २० वर्षीय सलमान खानने सांगितले की, मंगळवारी रात्री तो आपल्या घराजवळ होता. तेव्हा जमावाने त्याच्या पाठीवर एक केमिकल ओतले त्यामुळे त्याची त्वचा जळाली. तो पुढे म्हणाला, "काही अज्ञात लोकांनी मला माझ्या घराजवळ पकडून माझ्या पाठीवर ज्वलनशील पदार्थ ओतला. पदार्थ काय आहे याची मला कल्पना नाही. तो खूप गरम पदार्थ होता आणि माझी त्वचा जळण्यास सुरवात झाली.''

रात्री अकराच्या सुमारास पोलिसांनी त्यांना रुग्णालयात आणले असे सलमान म्हणाला. खासगी कंपनीत काम करणारे ३० वर्षीय अकील सैफी यांनी सांगितले की, गोकुळपुरी येथे हिंसाचाराने सर्वाधिक प्रभावित झालेल्या भागातील काही लोकांनी त्याला मारहाण केली. "मी मंगळवारी रात्री ८.३० च्या सुमारास कार्यालयातून घरी परत जात असताना अज्ञात लोकांनी माझे मोटारसायकल थांबवून मला मारहाण करण्यास सुरवात केली.  "माझ्या डाव्या हाताच्या बोटाला फ्रॅक्चर झाले होते आणि माझा मित्र बिलाल यांना किरकोळ दुखापत झाली," तो पुढे म्हणाला.

Web Title: Delhi Violence: 'That' mother jumped from the first floor with two girls; if you read reason you will be shocked! pda