Delhi Violence: So far 123 FIRs and 630 persons have been arrested/detained by the police pda | Delhi Violence : आतापर्यंत १२३ गुन्हे दाखल अन् ६३० जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात

Delhi Violence : आतापर्यंत १२३ गुन्हे दाखल अन् ६३० जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात

ठळक मुद्देकाहींना घरं सोडावी लागली. या हिंसाचारात दगडफेक आणि जाळपोळ मोठ्या प्रमाणात झाली. गाड्या जाळल्या, घरं जळाली, दुकानं लुटली, संपूर्ण बाजारपेठ जाळण्यात आली.

नवी दिल्ली - CAA वरून दिल्ली हिंसाचारप्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी १२३ गुन्हे नोंद केले आहेत. तर  ६३० जणांना पोलिसांनी ताब्यात आणि काहींना अटक केली असल्याची माहिती दिल्ली पोलिसांचे जनसंपर्क अधिकारी एमएस रांधवा यांनी दिली आहे. कालपासूनच हायकोर्टाने ताशेरे ओढल्यानंतर दिल्ली पोलिसांनी दंगेखोरांची धरपकड सुरु केली आहे.

Delhi Violence : पाकिस्तान्यांनो या, तुम्हाला भारताचं नागरिकत्व देतो म्हणत BSF जवानाचं घर पेटवलं

Delhi Violence : ताहिर हुसैनविरोधात गुन्हा दाखल, कधीही होऊ शकते अटक

 


काही दिवसांपासून देशाची राजनाधी असलेल्या दिल्लीमधल्या उत्तर पूर्व भागात मोठ्या प्रमाणात हिंसाचार पसरलेला आहे. त्यानंतर आता आंदोलकांनी बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (BSF)च्या जवानाच्या घरांवर निशाणा साधला आहे. २५ फेब्रुवारीच्या दुपारी खजुरी भागातील एका जवानाच्या घरात तोडफोड अन् जाळपोळ करण्यात आली होती. CAA  कायद्यावरुन दिल्लीतील मौजपूर, जाफराबाद भागात समर्थक आणि विरोधक भिडल्याने हिंसक आंदोलन पेटलं, जाळपोळ, दगडफेकीच्या घटनेने अनेकांचं जनजीवन विस्कळीत झालं. गाड्या जाळल्या, घरं जळाली, दुकानं लुटली, संपूर्ण बाजारपेठ जाळण्यात आली. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. काहींना घरं सोडावी लागली. या हिंसाचारात दगडफेक आणि जाळपोळ मोठ्या प्रमाणात झाली. आतापर्यंत ४३ जणांचा मृत्यू झाला आहे.

English summary :
Delhi Police PRO MS Randhawa told that We have registered 123 FIRs so far, around 630 people have been arrested detained in delhi violence case.

Web Title: Delhi Violence: So far 123 FIRs and 630 persons have been arrested/detained by the police pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.