शहरं
Join us  
Trending Stories
1
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
2
शरद पवारांनी दिलेला 'तो' प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला होता; संजय निरुपमांचा दावा
3
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल
4
'भाजपमुळे मस्ती वाढली'; मराठी गुजराती वादावार आदित्य ठाकरेंचा संताप
5
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
6
गुरु-शुक्र अस्तंगत: अडीच महिने विवाह मुहूर्त नाही? जुलैनंतर थेट नोव्हेंबरमध्ये सनई चौघडे
7
वडिलांच्या गैरहजेरीत अनेकदा नातेवाईकांनी दिला होता सनीला चोप; म्हणाला, 'रक्त येईपर्यंत मी...'
8
Smriti Irani : "पाकिस्तान आणि राहुल गांधींचा नेमका काय संबंध आहे?"; स्मृती इराणींचा खोचक सवाल
9
Sanju Samson Controversy : हे वागणं बरं नव्हं! सॅमसनचा पारा चढला पण झाली मोठी कारवाई
10
एअर इंडियाच्या पायलट, क्रू मेंबर्सच्या नोकऱ्या धोक्यात? अचानक ७८ फ्लाईट रद्द, प्रवासी खोळंबले
11
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारुख अब्दुल्ला यांचं विधान
12
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
13
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून गौरव मोरेची Exit! म्हणाला - "मला खूप वाईट वाटतंय की..."
14
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
15
२ शत्रू ग्रह अस्तंगत: ३ राशींना लाभच लाभ, ३ राशींना काहीसा संमिश्र काळ; कसा असेल प्रभाव?
16
Aadhar Housing Finance IPO: आजपासून खुला झाला Blackstone च्या कंपनीचा आयपीओ, पाहा डिटेल्स 
17
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
18
...अन् विलासराव देशमुखांमुळे रितेशची झाली मराठी सिनेमात एन्ट्री, अभिनेत्याने केला खुलासा
19
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
20
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

Delhi Violence: प्रचंड राडा! शेतकरी दिल्लीत घुसले; लाल किल्ल्यावर फडकवला धर्मध्वज

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2021 6:38 AM

एक महिन्यापूर्वीच शेतकऱ्यांनी  गणतंत्र दिनी ट्रॅक्टर रॅली काढण्याची घोषणा केली होती. ही रॅली कशी नियोजनबद्ध असेल याबाबत संयुक्त किसान मोर्चाने तयारी केली होती.

विकास झाडे नवी दिल्ली :  शिस्तीने ट्रॅक्टर रॅली काढू, असे आश्वासन दिलेल्या शेतकऱ्यांचा  संयम सुटला आणि दोन महिने अगदी शांततेत असलेल्या या आंदोलनाचा त्रिफळा उडाला. सर्वच सीमांवर बॅरिकेड्स तोडत शेतकऱ्यांनी  दिल्लीकडे कूच केले. पोलिसांना अश्रुधूर, लाठीचार्ज आदींचा वापर करावा लागला, परंतु बलाढ्य संख्या असलेल्या शेतकऱ्यांपुढे  तेही हतबल होते. लाल किल्ल्यावर शेतकऱ्यांनी झेंडा फडकवला.

दिल्लीतील घटनेनंतर हरयाणा सरकारने आपल्या राज्यात हाय अलर्ट जारी केला आणि कायदा हातात  घेणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा दिला. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उच्चस्तरीय बैठकीत दिल्लीतील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. आंदोलनकर्त्यांविरुद्ध पोलिसांनी चार एफआयआर दाखल केले आहेत. यंदाचा  प्रजासत्ताक दिन तणावाच्या सावटाखाली साजरा झाला.  दिल्ली येथे राजपथावर एकीकडे प्रजासत्ताक दिनाचा सोहळा साजरा होत असताना  दुसरीकडे सुरक्षा दल आणि शेतकरी आमने-सामने उभे ठाकले होते. राजपथावर ७२ व्या गणतंत्र दिनाचा मुख्य कार्यक्रम सुरू असतानाच सिंघू, टिकरी आणि गाझीपूर सीमेवरील शेतकऱ्यांनी  सकाळीच बॅरिकेड्स तोडत पूर्वनियोजित सूचनांना फाटा दिला. 

एक महिन्यापूर्वीच शेतकऱ्यांनी  गणतंत्र दिनी ट्रॅक्टर रॅली काढण्याची घोषणा केली होती. ही रॅली कशी नियोजनबद्ध असेल याबाबत संयुक्त किसान मोर्चाने तयारी केली होती.  तीन सीमांवरून ही रॅली काढण्याची परवानगी देण्यात आली असली तरी, शेतकरी आणि पोलीस यांच्यात अटी व नियम ठरले. त्यानुसार राजपथावरील शासकीय कार्यक्रम आटोपल्यानंतर शेतकऱ्यांच्या  रॅलीला सुरुवात होणार होती. दुपारी १२ वाजता रॅलीला सुरुवात करा, असे पोलिसांंनी शेतकऱ्यांना  बजावले होते. परंतु तीन तास आधीच शेतकऱ्यांनी  ट्रॅक्टरद्वारा पोलिसांचे बॅरिकेड्स तोडले.  त्यामुळे पोलीस आणि शेतकरी आमने-सामने आलेत. अनेक ठिकाणी दगडफेक झाली. पोलिसांनी लाठीचार्ज केला, काही ठिकाणी अश्रुधूर सोडावा लागला. सैराट वागणाऱ्या  काही शेतकऱ्यांच्या  हातात तलवारी आणि लाठ्याही दिसल्यात, परंतु ज्यांच्या हातात तलवारी, लाठ्या होत्या ते शेतकरी नव्हते, आंदोलनाला बदनाम करण्यासाठी कोणीतरी घुसवण्यात आले, असा आरोप शेतकरी नेत्यांनी केला. 

टॅग्स :delhiदिल्लीFarmer strikeशेतकरी संप