शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
7
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
8
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
9
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
10
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
11
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
12
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
13
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
14
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
15
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
16
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
17
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
18
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
19
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
20
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत

Delhi Violence: मानवाधिकाऱ्यांच्या संरक्षणासाठी मोदीजींनी CAA आणला- अमित शाह

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2020 7:39 PM

Delhi Violence: पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातील धार्मिक पीडितांच्या मानवी हक्कांचे संरक्षण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सीएए कायदा घेऊन आले आहेत.

ठळक मुद्देकेंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी ओडिशाची राजधानी असलेल्या भुवनेश्वरमध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्या(CAA)च्या समर्थनार्थ काढलेल्या रॅलीला संबोधित केलं. पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातील धार्मिक पीडितांच्या मानवी हक्कांचे संरक्षण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सीएए कायदा घेऊन आले आहेत. काँग्रेस पार्टी, समाजवादी पार्टी (सपा), बहुजन समाज पार्टी (बसपा) डावे आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. 

नवी दिल्लीः केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी ओडिशाची राजधानी असलेल्या भुवनेश्वरमध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्या(CAA)च्या समर्थनार्थ काढलेल्या रॅलीला संबोधित केलं. पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातील धार्मिक पीडितांच्या मानवी हक्कांचे संरक्षण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सीएए कायदा घेऊन आले आहेत. यावेळी त्यांनी काँग्रेस पार्टी, समाजवादी पार्टी (सपा), बहुजन समाज पार्टी (बसपा) डावे आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. अमित शाह म्हणाले, नागरिकत्व सुधारणा कायद्यासंदर्भात खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत. ज्यात मुस्लिमांचं नागरिकत्व काढून घेतलं जाईल, अशा प्रकारच्याही अफवा आहेत. त्यात कोणतंही तथ्य नाही. नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून विरोधक खोटं बोलून लोकांना चिथावणी देत आहेत. गैरसमज निर्माण करून दंगली घडवल्या जात आहेत. नागरिकत्व सुधारणा कायद्यानं मुस्लिम अल्पसंख्याकांचं नागरिकत्व जाणार नाही. लोकांचं नागरिकत्व काढून घेण्यासाठी नागरिकत्व सुधारणा कायदा आणलेला नसल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी स्पष्ट केलं आहे. देशाच्या विभाजनादरम्यान हिंदू, शीख, ख्रिश्चन, बौद्ध, जैन आणि पारशी समुदायातील लोक पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशात धर्माच्या आधारे विखुरले गेले होते. त्यांना भारताचं नागरिकत्व मिळवून देण्यासाठी हा कायदा आणला आहे. या समुदायातील लोकांना पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशात धर्माच्या आधारे त्रास दिला जात आहे. त्यांचं जोरजबरदस्तीनं धर्म परिवर्तन केलं जात आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्यात कोणाचंही नागरिकत्व काढून घेण्याची तरतूद कुठे आहे. आपण सत्यासाठी पाऊल उचलण्यास धजावतो आहोत. भुवनेश्वरमधल्या रॅलीला संबोधित करताना अमित शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलं आहे. मोदी सरकारनं गेल्या 70 वर्षांत अडगळीत पडलेले मुद्दे उचलून धरून ते सुधारण्याचं काम केलं आहे. तुम्ही मोदी सरकारची ताकद असल्यानंही हे शक्य झालं आहे. जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवणं गरजेचं होतं की नाही?, मोदी सरकारनं ट्रस्ट तयार करून अयोध्येत भव्य राम मंदिर निर्माणाचा मार्ग मोकळा केला आहे. 

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या

Delhi Violence : देशातून धर्मनिरपेक्षता, समाजवाद अन् लोकशाही संपुष्टात, मित्रपक्षाकडून भाजपाला घरचा आहेरDelhi Violence : पाकिस्तान्यांनो या, तुम्हाला भारताचं नागरिकत्व देतो म्हणत BSF जवानाचं घर पेटवलंDelhi Violence : आतापर्यंत १२३ गुन्हे दाखल अन् ६३० जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात...म्हणून राणेंनी केले उद्धव ठाकरे यांचे मनापासून अभिनंदनपाच दिवसांचा आठवडा करण्याविरोधात न्यायालयात याचिका, ठाकरे सरकारच्या अडचणीत वाढ

टॅग्स :Amit Shahअमित शहाcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकdelhi violenceदिल्ली