...म्हणून राणेंनी केले उद्धव ठाकरे यांचे मनापासून अभिनंदन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2020 05:51 PM2020-02-28T17:51:36+5:302020-02-28T17:55:49+5:30

उद्धव ठाकरे यांचे कट्टर विरोध म्हणून ओळखले जाणारे भाजपाचे नेते निलेश राणे यांनी ठाकरे सरकारचे मनापासून अभिनंदन केले आहे.

BJP leader Nilesh Rane congratulates CM Uddhav Thackeray for canceling Shripad Chindam counselor post mac | ...म्हणून राणेंनी केले उद्धव ठाकरे यांचे मनापासून अभिनंदन

...म्हणून राणेंनी केले उद्धव ठाकरे यांचे मनापासून अभिनंदन

Next

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अपशब्द काढणाऱ्या श्रीपाद छिंदमलाउद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने आज दणका दिला. शिवाजी महाराजांविषयी अपशब्द काढल्याप्रकरणी श्रीपाद छिंदम याचे नगरसेवकपद रद्द करण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या सरकारने घेतला. राज्य सरकारच्या या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांचे कट्टर विरोध म्हणून ओळखले जाणारे भाजपाचे नेते निलेश राणे यांनी ठाकरे सरकारचे मनापासून अभिनंदन केले आहे.

श्रीपाद छिंदमने 2018मध्ये अहमदनगर महापालिकेच्या उपमहापौरपदावर असताना फोनवर बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द उच्चारले होते. त्यानंतर छिंदमविरोधात राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. जनक्षोभ पाहून छिंदमकडून उपमहापौरपदाचा राजीनामा घेण्यात आला होता. तसेच त्याची भाजपामधूनही हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर त्याचे नगरसेवकपदही रद्द करण्याचा ठराव अहमदनगरच्या महानगरपालिकेत पारीत करण्यात आला होता.

श्रीपाद छिंदमने यानंतर 2018मध्ये झालेली अहमदनगर महानगरपालिकेची निवडणूक अपक्ष म्हणून लढवली होती. त्यावेळी  निवडणूक काळात प्रशासनाने छिंदमला शहरातून हद्दपार केले होते. मात्र असे असूनही श्रीपाद छिंदम अहमनगर महानगरपालिकेच्या प्रभाग 9 (क) मूधन सर्वसाधारण जागेवर अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आला होता. मात्र आज राज्य सरकारने छिंदमला दणका देत महापुरुषांबद्दल अपशब्द उच्चारल्याच्या आरोपाखाली नगरसेवकपद रद्द केले आहे. राज्य सकारच्या याच निर्णयाचे निलेश राणे यांनी ट्विट करुन खूप चांगला निर्णय असल्याचे सांगत अभिनंदन केले आहे.

Web Title: BJP leader Nilesh Rane congratulates CM Uddhav Thackeray for canceling Shripad Chindam counselor post mac

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.