शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
2
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
3
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
4
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
5
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
6
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
7
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
8
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
9
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
10
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
11
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
12
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
13
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
14
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
15
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
16
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
17
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
18
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
19
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
20
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!

Farmers Protest: “मी माझ्या जीवनातील २० दिवस दिले आणि सनी देओलनं माझी फसवणूक केली”

By प्रविण मरगळे | Published: February 01, 2021 10:02 AM

प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावर काही हिंसक शेतकऱ्यांनी पोलिसांना मारहाण करत थेट आतमध्ये घुसले, याठिकाणी आंदोलकांनी साहिब निशान फडकवले होते.

नवी दिल्ली – गेल्या २ महिन्यापासून दिल्ली बॉर्डरवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. प्रजासत्ताकदिनी शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅली काढली परंतु यावेळी काही शेतकऱ्यांनी हिंसक आंदोलन केले, थेट लाल किल्ल्यात घुसून शेतकऱ्यांनी धर्मध्वज फडकवला, शेतकऱ्यांना भडकवण्याचा आरोप ज्या दीप सिद्धूवर ठेवण्यात आला आहे तो अद्याप फरार  आहे. मात्र दीप सिद्धूचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यात त्याने भाजपा खासदार सनी देओल याच्यावर फसवणुकीचा आरोप केला आहे.

प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावर काही हिंसक शेतकऱ्यांनी पोलिसांना मारहाण करत थेट आतमध्ये घुसले, याठिकाणी आंदोलकांनी साहिब निशान फडकवले होते, पंजाबी गायक दीप सिद्धू याच्यावर शेतकरी नेत्यांनी आरोप केले होते, दीप सिद्धूने व्हिडीओत म्हटलंय की, सनी देओलने लोकांचा विश्वासघात केला आहे. मी माझ्या आयुष्यातील २० दिवस सनी देओल माझा भाऊ आहे म्हणून प्रचार केला, भाजपासाठी मतदान मागितलं नव्हतं, मी आरएसएस, भाजपाचा माणूस आहे असं सांगितलं जात आहे, सनी देओल सोशल मीडियात पोस्टवर पोस्ट करत आहेत असं त्याने सांगितले.

तर मी पंजाब आणि येथील लोकांचा आवाज उठवला, पण माझ्यावर गद्दारीचा शिक्का मारण्यात आला. मला या गोष्टीची पर्वा नाही की सरकार काय म्हणतं, लोक काय म्हणतात त्यामुळे मी दुखी आहे, बिहारी मजुरांसह शेतात राहिल्याचं दीप सिद्धूने सांगितले, तर ही माणसं मला साथ देतात म्हणून मी त्यांच्यामध्ये राहत आहे, जर मी सरकारचा माणूस असतो तर लग्झरी हॉटेलमध्ये मजेत राहिलो असतो असं त्याने सांगितले, यापूर्वीही दीप सिद्धूचा व्हिडीओ व्हायरल झाला होता,

या व्हिडीओत सिद्धूने माझ्या कुटुंबाला त्रास देऊ नका असं सांगितलं होतं, तर चौकशीत मी सहभागी होण्यास तयार आहे. २६ जानेवारीला झालेल्या हिंसक आंदोलनानंतर अनेक शेतकरी नेत्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्यावेळी व्हिडीओ पुराव्याच्या सहाय्याने दीप सिद्धूची ओळख पटली होती.

दीप सिद्धू भाजपाचा माणूस – राकेश टिकैत

भारतीय किसान यूनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांनी आरोप लावला आहे की, दीप सिद्धू भाजपाचा माणूस आहे. लाल किल्ल्यावरील घटनेनंतर दीप सिद्धूची गुरदासपूरचे भाजपा खासदार सनी देओल यांच्यासोबतचा फोटो व्हायरल झाला होता, त्यानंतर सनी देओलने ट्विट करून दीप सिद्धूचा माझ्या कुटुंबाशी काहीही संबंध नाही असं स्पष्टीकरण दिले होते.

टॅग्स :FarmerशेतकरीSunny Deolसनी देओलBJPभाजपा