शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींनी वाराणसीतून तिसऱ्यांदा दाखल केला उमेदवारी अर्ज, शाह-राजनाथ यांच्यासह हे दिग्गज होते उपस्थित
2
कोरेगाव भीमा प्रकरणः गौतम नवलखा यांना जामीन, प्रक्षोभक भाषणाच्या आरोपावरून होते नजरकैदेत
3
"दिल्लीच्या 'त्या' बैठकीत मोदींनी ठाकरेंना पुन्हा एकत्र येण्याची ऑफर दिली होती"
4
T20 World Cup 2024 साठी बांगलादेशचा तगडा संघ; २२ वर्षीय खेळाडूला संधी!
5
होर्डिंगच्या पायाभरणीतील 'ती' एक चूक अन् १४ कुटुंबांवर कोसळला दुःखाचा डोंगर!
6
सोनं -चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! दुसऱ्या दिवशीही दर कोसळले; वाचा आजचे दर
7
Fact Check: PM मोदींच्या विजयावर शंका घेणारा नितीश कुमारांचा व्हायरल व्हिडिओ जुना; पाहा, सत्य
8
4 जूनला किती वेळ राहिलाय, थोडा धीर...; पृथ्वीराज चव्हाणांच्या अंदाजावर भुजबळांचा सल्ला
9
'तू आई होऊ शकत नाहीस'; डॉक्टरांनी रुपाली गांगुलीला दिला होता IVF चा सल्ला, पण..
10
पावसानं गुजरातला 'बुडवलं', पण फ्रँचायझीकडून चाहत्यांना 'खुशखबर', केली मोठी घोषणा!
11
हायप्रोफाईल चोर, हवेतल्या हवेत मारायचा मौल्यवान दागिन्यांवर डल्ला, वर्षभरात २०० विमानात केली चोरी 
12
"लोक मदतीसाठी ओरडत होते पण आम्ही काहीच करु शकलो नाही"; होर्डिंग कोसळलं, 14 जणांचा मृत्यू
13
यशवंत जाधव, रवींद्र वायकर हे महापालिकेचे लाभार्थी, ज्यांनी मुंबई लुटली - संजय राऊत
14
बळीराजासाठी आनंदाची बातमी! येत्या ८ दिवसांत मान्सून अंदमानात दाखल होणार
15
अखेर दयाबेन सापडली! ७ वर्षांनंतर 'तारक मेहता...'मध्ये दिशा वकानीला रिप्लेस करणार २८ वर्षीय अभिनेत्री
16
इस्रायलला गाझावर अणुबॉम्ब टाकण्याची परवानगी मिळायला हवी; अमेरिकी खासदाराचे खळबळजनक वक्तव्य
17
आईच्या निधनानंतर आता...; वाराणसीमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी भावुक झाले पंतप्रधान मोदी
18
DC vs LSG : 'करा किंवा मरा'! पंतची एन्ट्री; राहुलसोबतच्या नाट्यमय घडामोडींनंतर पहिलाच सामना
19
Fact Check : हैदराबादमध्ये मोदींनी AIMIM ला पाठिंबा दिल्याच्या Video दिशाभूल करणारा; जाणून घ्या 'सत्य'
20
घाटकोपरच्या 'त्या' होर्डिंगवरून BMC आणि रेल्वे प्रशासनात टोलवाटोलवी, परवानगी कुणी दिली?

राम मंदिर आणि दिल्लीत घातपाताचा होता मोठा डाव, दहशतवाद्याची धक्कादायक माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2020 4:11 PM

दिल्ली आणि उत्तर प्रदेशात राम मंदिर होत असलेल्या ठिकाणी घातपात करण्याचा मोठा डाव असल्याची माहिती समोर आली आहे.

नवी दिल्ली - दिल्लीतील धौला कुआं रिंग रोड परिसरात ISIS च्या एका दहशतवाद्याला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. चौकशीदरम्यान या दहशतवाद्याने आता धक्कादायक माहिती दिली आहे. दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये राम मंदिर होत असलेल्या ठिकाणी घातपात करण्याचा मोठा डाव असल्याची माहिती समोर आली आहे. अबू युसूफ असं या दहशतवाद्याचं नाव आहे. दहशतवाद्याकडून मोठ्या प्रमाणात IED स्फोटकांचा साठा जप्त करण्यात आला आहे. 

अबू युसूफने राम मंदिर आणि दिल्लीत घातपाताचा मोठा डाव असल्याचं सांगितलं आहे. तसेच तो अफगाणिस्तानमधील काही साथीदारांच्या संपर्कातही होता. या दोन ठिकाणी मोठे हल्ले घडवून आणण्याचा डाव असल्याची प्राथमिक माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी अलर्ट जारी केला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत. गुप्तचर यंत्रणेकडून यासंदर्भात माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस यंत्रणा सतर्क होती आणि त्यांनी सर्च ऑपरेशन सुरू केलं. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीमध्ये चकमक सुरू झाली असून ISISचा एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली. 

दिल्ली पोलिस स्पेशल सेलचे डीसीपी प्रमोदसिंग कुशवाह यांनी दिलेल्या माहितीनुसार, धौला कुआंमध्ये दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने केलेल्या कारवाईनंतर ISIS च्या एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली. आणखी काही दहशतवाद्यांना अटक करण्यात येऊ शकते. दिल्ली पोलिसांनी दहशतवाद्यांचा मोठा कट उधळून लावला आहे. IED स्फोटकांचा साठा जप्त केला आहे. अबू युसूफ या दहशतवाद्याकडून दोन IED स्फोटकं जप्त करण्यात आली आहेत. त्याच्यासोबत आणखी एक साथीदार असल्याची माहिती मिळत आहे. मात्र चकमकीदरम्यान तो फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत

अयोध्येत राम जन्मभूमीवर मंदिर उभारणीला सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे पाकिस्तान मोठा कट आखत असल्याचं वृत्त काही दिवसांपूर्वी समोर आलं होतं. पाकिस्तान राम मंदिर उभारणीचा बदला घेण्यासाठी भारतातील हिंदू नेत्यांवर हल्ला करण्याचा कट आखत आहे. यासंदर्भात, गुप्तचर संस्थांकडून तीन राज्यांना अलर्ट करण्यात आहे. टाइम्स नाऊने दिलेल्या वृत्तानुसार, इंटेलिजेंस ब्यूरोने वेगवेगळ्या राज्यांना अलर्ट जारी करताना म्हटले होते, की पाकिस्तान भारतात राहणाऱ्या आंतरराष्ट्रीय गँगशी संबंधित असलेल्या आरोपींचा वापर करून, हिंदू नेत्यांना मारण्याचा कट आखत आहे. टाइम्स नाऊकडे या अलर्टची कॉपी असल्याचेही समजते.

महत्त्वाच्या बातम्या

देशी युद्धनौका INS Vikrant मारणार अथांग समुद्रात सूर; 26 लढाऊ विमानांसह चाचणी सुरू

Sushant Singh Rajput Case : सुशांतच्या पोस्टमॉर्टममध्ये काहीतरी गडबड?, CBI ला शंका; डॉक्टर संशयाच्या फेऱ्यात

मोबाईल बँकिंगमध्ये फ्रॉडचा धोका, SBI ने दिला खातेदारांना मोलाचा सल्ला

19 वर्षांचं नातं काही सेकंदांत तुटलं! WhatsApp वरून दिला पत्नीला तलाक

मोठी कारवाई! दिल्लीच्या धौला कुआंमध्ये चकमक, ISIS च्या एका दहशतवाद्याला अटक, स्फोटकांचा साठा जप्त

टॅग्स :terroristदहशतवादीdelhiदिल्लीRam Mandirराम मंदिरIndiaभारतPoliceपोलिस