दिल्लीतील 400 शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी; लहान मुलगा अटकेत, दहशतवादी कनेक्शन?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 16:47 IST2025-01-14T16:46:30+5:302025-01-14T16:47:28+5:30
Delhi School Bomb Threat: मुलाचे वडील दहशतवादी अफजल गुरूच्या फाशीविरोधात आवाज उठवणाऱ्या एनजीओशी संबंधित असल्याचे पोलिसांनी उघड केले आहे.

दिल्लीतील 400 शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी; लहान मुलगा अटकेत, दहशतवादी कनेक्शन?
Delhi School Bomb Threat: दिल्लीतील 400 शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी दिल्याप्रकरणी मोठा खुलासा झाला आहे. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणात एका मुलाला ताब्यात घेतले आहे. तसेच, त्याच्याकडून लॅपटॉप आणि मोबाईलवरही जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या मुलाचे कुटुंब एका एनजीओच्या संपर्कात होते. या एनजीओचे दहशतवादी अफझल गुरुशी संबंध उघड झाले आहेत.
या मुलाचे वडील दहशतवादी अफजल गुरूच्या फाशीविरोधात आवाज उठवणाऱ्या एनजीओशी संबंधित असल्याचे पोलिसांनी उघड केले आहे. स्पेशल सीपी मधुप तिवारी म्हणाले, शाळांमध्ये अनेक दिवसांपासून बॉम्ब ठेवल्याचे बनावट कॉल/मेल येत होते. गेल्या वर्षी 12 फेब्रुवारीपासून अशाप्रकारचे अनेक कॉल आणि मेल्सला सुरुवात झाली. हे मेल अतिशय प्रगत पद्धतीने पाठवले जात होते, त्यामुळे आरोपींना शोधण्यात पोलिसांना वेळ लागला. अशातच, 8 जानेवारी 2025 ला शेवटचा कॉल आला होता, त्यानंतर आता पोलिसांनी एका मुलाला ताब्यात घेतले आहे.
एनजीओ अफझल गुरूच्या फाशीच्या विरोधात
मधुप तिवारी पुढे म्हणाल्या की, दिल्लीतील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या या मुलाच्या कृत्यामागे कोणाचा हात आहे? याचा आम्ही तपास करत आहोत. मुलाचे वडील ज्या एनजीओशी संबंधित आहेत, त्या एनजीओने दहशतवादी अफझल गुरुला फाशीला देण्याच्या विरोधातही आवाज उठवला होता. दरम्यान, आता पोलीस वेगवेगळ्या अँगलनेही तपास करत आहेत.