Delhi Blast : "आम्ही गेट उघडलं आणि पळत सुटलो..."; दिल्ली स्फोटादरम्यान प्रत्यक्षदर्शीने कसा वाचवला जीव?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 11:28 IST2025-11-11T11:25:04+5:302025-11-11T11:28:17+5:30
Delhi Blast : दिल्ली लाल किल्ला स्फोटामध्ये आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे आणि अनेक लोक जखमी झाले आहेत.

फोटो - ndtv.in
दिल्ली लाल किल्ला स्फोटामध्ये आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे आणि अनेक लोक जखमी झाले आहेत. दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लाल किल्ल्यावरील स्फोट हा सामान्य स्फोट नव्हता तर एक मोठा बॉम्बस्फोट होता. स्फोटाचा परिणाम २०० मीटरपर्यंत दिसला. सुरुवातीच्या तपासात ही एक मोठी दहशतवादी घटना असल्याचं दिसून येतं आहे
स्फोट झाला त्यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेले उपेंद्र म्हणाले की, "माझी लोडिंगची एक गाडी होती, जी अजूनही स्फोट झाला त्याच्या अगदी समोर उभी आहे. तिचं सर्व काही तुटलेलं आहे, मोठं नुकसान झालं. कारण आमच्या मागे असलेल्या कारमध्ये स्फोट झाला... नेमकं काय झालं माहित नाही. आम्ही गेट उघडलं आणि लगेच पळत सुटलो. बॉम्ब फुटल्यासारखा मोठा आवाज आला, आग लागली."
#WATCH | Delhi: Rapid Action Force (RAF) deployed at the spot near the Red Fort, where a blast took place in a Hyundai i20 car yesterday at around 7 pm
— ANI (@ANI) November 11, 2025
Several agencies, including Delhi Police, FSL and others, carry out an investigation at the spot. Eight people died in the… pic.twitter.com/ooxcBU1Jsh
दिल्ली स्फोटाशी संबंधित महत्त्वाच्या माहितीवरून असं दिसून येतं की, हा स्फोट एका I-20 कारमध्ये झाला होता, ज्यामध्ये इतर अनेक प्रवासी देखील होते. हा स्फोट कारच्या मागील बाजूस झाला. स्फोटानंतर घटनास्थळी कोणताही खड्डा नव्हता. कोणत्याही जखमींच्या मृतदेहावर खिळे किंवा तारा नव्हत्या. जखमींचे चेहरे किंवा स्फोटामुळे शरीर काळे झालेले नाही आणि मृतांचेही नाही.
विशेष सेल टीम फॉरेन्सिक तज्ञांसह स्फोट झालेल्या वाहनाच्या तुटलेल्या भागांवरून वाहनाचा नंबर ओळखण्याचं काम करत आहे. दिल्ली स्फोटानंतर, घटनास्थळ सील करण्यात आले आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष गुन्हे शाखेच्या पथकासह NIA, NSG आणि इतर एजन्सी तपासात सहभागी झाल्या आहेत. घटनास्थळी बॅरिकेडिंग करण्यात आले आहे. याच दरम्यान, स्फोटात जखमी झालेल्यांना उपचारासाठी LNJP येथे आणले जात आहे, स्फोटानंतर, अलर्ट जारी करण्यात आला आहे.