लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 20:03 IST2025-11-13T20:01:35+5:302025-11-13T20:03:23+5:30
या सर्व कारचा वापर ६ डिसेंबर रोजी विविध ठिकाणी दहशतवादी हल्ल्यांसाठी करण्यात येणार होता. महत्वाचे म्हणजे, हल्ल्यांसाठी जी ठिकाणे निवडण्यात आली होती, त्यांतील ६ ठिकाणे एकट्या एकट्या दिल्लीत होती, असे सांगण्यात येत आहे.

लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
दिल्ली कार ब्लास्ट प्रकरणाचा तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसा दहशतवाद्यांच्या भीषण कारस्थानांचा पर्दाफाश होत आहे. आतापर्यंत केवळ चार कारांपर्यंत मर्यादित वाटणाऱ्या “व्हाईट कॉलर टेरर” कटाचा विस्तार आता तब्बल ३२ कारपर्यंत पोहोचल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महत्वाचे म्हणजे, जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी या कारचा वापर ६ डिसेंबर रोजी, बाबरी मशीद पाडल्याच्या घटनेचा “बदला” घेण्यासाठी करण्याचा प्लॅन आखला होता, असे समोर येत आहे.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, तपासकर्त्यांना मिळालेल्या माहितीतून, या सर्व कारची तयारी स्फोटके वाहून नेणे आणि स्फोट घडविणे यासाठी सुरू होती. सोमवारी झालेल्या स्फोटात वापरलेली ह्युंदाई आय२० ही त्यांपैकी एक कार. याशिवाय मारुती ब्रेझा, स्विफ्ट डिजायर आणि फोर्ड इकोस्पोर्ट या कारही जप्त करण्यात आल्या आहेत. या सर्व कारचा वापर ६ डिसेंबर रोजी विविध ठिकाणी दहशतवादी हल्ल्यांसाठी करण्यात येणार होता. महत्वाचे म्हणजे, हल्ल्यांसाठी जी ठिकाणे निवडण्यात आली होती, त्यांतील ६ ठिकाणे एकट्या एकट्या दिल्लीत होती, असे सांगण्यात येत आहे.
ज्या कार आतापर्यंत वापरल्या गेल्या, त्या जुन्या आणि अनेकांना विक्री झालेल्या असल्याने वापरण्यात आल्या. पोलिसांना कटाच्या मुख्य सूत्रधारांपर्यंत पोहोचणे अवघड व्हावे, हा या मागचा हेतू. आतापर्यंत तीन कार पोलिसांनी जप्त केल्या आहेत, तर चौथी कार स्फोटात उडवण्यात आली.
फरीदाबादमधील अल-फलाह स्कूल ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च सेंटरमधून गुरुवारी ब्रेझा (HR87 U 9988) कार जप्त करण्यात आली. तसेच, बुधवारी फोर्ड इकोस्पोर्ट (DL10 CK 0458) ही कारही फरिदाबादमधून जप्त करण्यात आली. या दोन्ही कारचा वापर स्फोटके वाहून नेण्यासाठी करण्यात आला होता. तर, स्विफ्ट डिजायर सोमवारी ब्लास्टपूर्वीच जप्त करण्यात आली होती. या कारमधून असॉल्ट रायफल आणि दारुगोळा हस्तगत करण्यात आला होता.