शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

Delhi Election 2020 : 'आप' विरोधात भाजपाचे 200 खासदार मैदानात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2020 8:11 AM

Delhi Election 2020 : आम आदमी पार्टी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना घेरण्यासाठी भाजपाने तगडी फौज मैदानात उतरवली आहे.

ठळक मुद्देआम आदमी पार्टी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना घेरण्यासाठी भाजपाने तगडी फौज मैदानात उतरवली आहे.तब्बल 200, खासदार, 70 केंद्रीय मंत्री आणि 11 मुख्यमंत्री दिल्लीमध्ये प्रचारासाठी येत आहेत.सोशल मीडियासह विविध ठिकाणी आपद्वारे भाजपावर निशाणा साधला जात आहे. 

नवी दिल्ली - दिल्ली विधानसभेसाठी 8 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, 11 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. आम आदमी पार्टी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना घेरण्यासाठी भाजपाने तगडी फौज मैदानात उतरवली आहे. तब्बल 200 खासदार, 70 केंद्रीय मंत्री आणि 11 मुख्यमंत्र्यांना पाचारण करण्यात आले आहे. ही 250 जणांची फौज हरवण्यासाठी येत असल्याची टीका आपने केली आहे. दिल्लीतील  70 विधानसभा मतदारसंघामध्ये प्रचाराने वेग घेतला आहे. 

सत्ताधारी आप, केंद्रात सत्तेत असलेला भाजपा आणि दोन्हीकडे विरोधी पक्ष असलेला काँग्रेस अशा तिन्ही पक्षांनी मोठी ताकद लावली आहे. भाजपाने ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची करून तगडी फौज केजरीवालांविरोधात उभी करणार असल्याचं चित्र आहे. तब्बल 200, खासदार, 70 केंद्रीय मंत्री आणि 11 मुख्यमंत्री दिल्लीमध्ये प्रचारासाठी येत आहेत. हे सर्व जण आपला हरवण्यासाठी मुक्काम ठोकणार असल्याचा जोरदार प्रचार आपच्या वतीने सध्या सुरू झाला आहे. सोशल मीडियासह विविध ठिकाणी आपद्वारे भाजपावर निशाणा साधला जात आहे. 

आप सरकारने गेल्या पाच वर्षात केलेल्या कामांना भाजपा घाबरला असून पंतप्रधान मोदी यांचा अपवाद वगळता सर्वांनाच प्रचाराच सक्रिय करण्यात आले आहे. मात्र दिल्लीकर मतदार हे सूज्ञ असून ते केजरीवाल यांना मत देतील असा दावा आपने केला आहे. केजरीवाल विरुद्ध भाजपा असे फोटो आणि टॅगलाईनमधून आपकडून भाजपाचा खरपूस समाचार घेतला जात आहे. दिल्लीत सध्या विधानसभा निवडणुकांचे वारे असून आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांचं पारडं जड आहे. रिक्षावालेही केजरीवाल यांचा प्रचार करत आहेत. पण, एका रिक्षावाल्यास केजरीवाल यांचा प्रचार चांगलाच महागात पडला. कारण, दिल्ली पोलिसांनी संबंधित रिक्षावाल्याकडून 10 हजार रुपयांचा दंड वसूल केला.

एका रिक्षावाल्याने केजरीवाल यांच्या प्रचारार्थ आय लव्ह केजरीवाल अशा आशयाचे स्टीकर रिक्षावर लावले होते. त्यामुळे, संबंधित रिक्षावाल्याकडून वाहतूक पोलिसांनी चक्क 10 हजार रुपयांचे चलन फाडले. वाहतूक पोलिसांच्या या मनमानी कारभाराविरोधात रिक्षावाल्याने थेट दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली. या याचिकेवर न्यायालयाने दिल्ली पोलिसांना नोटीस पाठवली आहे. कुठल्या नियमांतर्गत हे चलन फाडले, असा प्रश्नही न्यायालयाने विचारला आहे. 3 मार्च रोजी या याचिकेवर पुढील सुनावणी होणार आहे. दरम्यान, ही घटना गेल्यावर्षीची असून केजरीवाल यांनीही ट्विट करुन याबाबत प्रश्न विचारला होता.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विटरवर व्हिडिओ पोस्ट करत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधला आहे. केजरीवाल म्हणाले की, 'मी गेल्या काही दिवसांपासून पाहत आहे की, अमित शहा आपल्या प्रचार सभेमध्ये दिल्लीकरांचा अपमान करत आहेत. दिल्लीकरांनी आपल्या मेहनतीने शाळा, रुग्णालय सुधारली आहेत. मात्र अमित शहा हे दिल्लीतील शाळांचा आणि विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा अपमान करत आहे'. त्यामुळे बरेच पालक दुखावले असल्याचा दावा सुद्धा केजरीवाल यांनी केला.

महत्त्वाच्या बातम्या 

विचित्र अपघात : रिक्षासह एसटी बस विहिरीत; 25 प्रवासी ठार, 30 जखमी

चीनमधील भारतीयांना विमानाने आणणार; कोरोनाग्रस्त वुहानमध्ये २५0 विद्यार्थी

‘एअर इंडिया’च्या विक्रीसाठी अटी आणखी शिथिल करणार, उड्डाणमंत्री एच. एस. पुरी यांची माहिती

सलग तीन दिवस बँका राहणार बंद, इंडियन बँक असोसिएशनने दिली संपाची हाक

 

टॅग्स :delhi electionदिल्ली निवडणूकdelhiदिल्लीAAPआपBJPभाजपाArvind Kejriwalअरविंद केजरीवालAmit Shahअमित शहा