शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

खाकी विरुद्ध खाकी! शिमल्यामध्ये हायव्होल्टेज ड्रामा; दिल्ली पोलिसांना हिमाचल पोलिसांनी ५ तास रोखलं, नेमकं प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 09:15 IST

Delhi Police vs HP Police: दिल्लीतील AI समिटमध्ये शर्टलेस आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना पकडण्यासाठी गेलेल्या दिल्ली पोलिसांना शिमल्यात रोखण्यात आले. हिमाचल पोलिसांनी दिल्ली पोलिसांवर अपहरणाचा गुन्हा दाखल केल्याने खळबळ.

देशाची राजधानी दिल्ली आणि हिमाचल प्रदेशचे पोलीस बुधवारी शिमला येथे आमनेसामने आल्याने खळबळ उडाली. दिल्लीत पार पडलेल्या 'एआय समिट' दरम्यान झालेल्या 'शर्टलेस' आंदोलनाचे धागेदोरे शिमल्यापर्यंत पोहोचले आहेत. रोहडू येथून तीन युवक काँग्रेस कार्यकर्त्यांना अटक करून दिल्लीला नेणाऱ्या दिल्ली पोलिसांच्या पथकाला हिमाचल पोलिसांनी तब्बल ५ तास ताब्यात ठेवल्याने दोन्ही राज्यांच्या पोलिसांत मोठा संघर्ष पाहायला मिळाला.

२० फेब्रुवारी २०२६ रोजी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित 'इंडिया एआय इम्पैक्ट समिट'मध्ये युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शर्ट काढून आंदोलन केले होते. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत शिमल्याजवळील रोहडू येथील एका रिसॉर्टवर छापा टाकला. येथून सौरभ, सिद्धार्थ आणि अरबाज या तिघांना ताब्यात घेऊन दिल्ली पोलीस पथक निघाले होते.

हिमाचल पोलिसांचा आक्षेप आणि 'अपहरणाचा' गुन्हादिल्ली पोलिसांनी स्थानिक पोलिसांना कोणतीही पूर्वकल्पना न देता ही कारवाई केल्याचा दावा हिमाचल पोलिसांनी केला. यामुळे संतप्त झालेल्या हिमाचल पोलिसांनी सोलन जिल्ह्यातील धरमपूर येथे नाकाबंदी करून दिल्ली पोलिसांच्या गाड्या अडवल्या. स्थानिक पोलिसांच्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांनी रिसॉर्टमधील सीसीटीव्हीचा डीव्हीआर कोणतीही पावती न देता सोबत नेला होता. या प्रकरणी हिमाचल पोलिसांनी दिल्ली पोलिसांच्या १५ ते २० कर्मचाऱ्यांविरुद्ध चक्क 'अपहरणाचा' गुन्हा दाखल केला आणि त्यांना ५ तास रोखून धरले.

२४ तासांनंतर संघर्ष निवळलाबुधवार रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या हायव्होल्टेज ड्रामानंतर, गुरुवारी पहाटे दिल्ली पोलिसांनी स्थानिक न्यायालयातून 'ट्रान्झिट रिमांड' मिळवला. त्यानंतरच हिमाचल पोलिसांनी दिल्ली पोलिसांच्या पथकाला आणि अटक केलेल्या कार्यकर्त्यांना दिल्लीकडे जाण्याची परवानगी दिली.

English
हिंदी सारांश
Web Title : Delhi Police Detained by Himachal Police in Shimla Showdown

Web Summary : Delhi and Himachal police clashed in Shimla after Delhi police, investigating a protest, arrested three people. Himachal police detained the Delhi team for five hours, alleging lack of notification and theft of CCTV footage, even filing kidnapping charges. The issue resolved after a transit remand was secured.
टॅग्स :delhiदिल्लीHimachal Pradeshहिमाचल प्रदेशPoliceपोलिस