ड्रोनद्वारे शस्त्रे, पोलीस चौकीवर ग्रेनेड हल्ला अन्...; 'दुबई'च्या आमिषाने तरुण करत होता नव्या दहशतवादी संघटनेसाठी काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 15:20 IST2026-03-24T15:19:50+5:302026-03-24T15:20:07+5:30

पाकिस्तानमधून चालवल्या जाणाऱ्या दहशतवादी संघटनेचा मोठा कट दिल्ली पोलिसांच्या सतर्कतेमुळे उधळून लावला.

Delhi Police Special Cell Busts International Terror Module 18 Year Old Youth Arrested | ड्रोनद्वारे शस्त्रे, पोलीस चौकीवर ग्रेनेड हल्ला अन्...; 'दुबई'च्या आमिषाने तरुण करत होता नव्या दहशतवादी संघटनेसाठी काम

ड्रोनद्वारे शस्त्रे, पोलीस चौकीवर ग्रेनेड हल्ला अन्...; 'दुबई'च्या आमिषाने तरुण करत होता नव्या दहशतवादी संघटनेसाठी काम

Delhi Police Busted TTH Module:दिल्लीपोलिसांच्या स्पेशल सेलने एका अत्यंत खतरनाक आंतरराष्ट्रीय दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला असून, देशाच्या सुरक्षेला असलेला एक मोठा धोका टळला आहे. अवघ्या १८ वर्षांच्या एका तरुणाला अटक करण्यात आली असली, तरी त्याच्या मोबाईलमध्ये सापडलेले पुरावे कोणत्याही दहशतवाद्यापेक्षा कमी नाहीत. पाकिस्तानमधून चालवल्या जाणाऱ्या तहरीक-ए-तालिबान हिंदुस्थान या नव्या दहशतवादी संघटनेचा हा कट दिल्लीपोलिसांच्या सतर्कतेमुळे उधळून लावला गेला आहे.

ऑपरेशन मटकहेडा आणि हरमनची अटक

उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यातील मटकहेडा गावातील १८ वर्षीय हरमनदीप सिंह उर्फ हरमन याला स्पेशल सेलने कश्मीरी गेट परिसरातून बेड्या ठोकल्या. हरमन हा केवळ एक गुन्हेगार नसून, तो पाकिस्तानमध्ये बसलेल्या गँगस्टर-टेररिस्ट शाहजाद भट्टीचा भारतातील मुख्य मोहरा बनला होता. त्याच्या मोबाईलमधील चॅट्स, फोटो आणि व्हिडिओंनी पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकवली आहे.

काय आहे होता प्लॅन?

तपासात समोर आले की, हरमनला शाहजाद भट्टीने पंजाबमधील होशियारपूर येथे तहरीक-ए-तालिबान हिंदुस्थान असे स्प्रे पेंटने भिंतीवर लिहिण्याचे आदेश दिले होते. ही केवळ ग्राफिटी नसून, लोकांमध्ये दहशत पसरवण्यासाठीचा एक संदेश होता. महत्त्वाचे म्हणजे, पंजाबमध्ये अलीकडेच दोन पोलीस कर्मचाऱ्यांच्या हत्येनंतर या संघटनेचे नाव चर्चेत आले होते. हरमनने या ग्राफिटीचे व्हिडिओ बनवून पाकिस्तानला पाठवले होते, जेणेकरून त्याचा वापर प्रचारासाठी केला जाऊ शकेल.

पोलीस चौकीवर ग्रेनेड हल्ल्याचा होता कट!

सर्वात धक्कादायक खुलासा म्हणजे, हरमन आणि त्याचा साथीदार अनस यांना रामपूरमधील एका पोलीस चौकीवर ग्रेनेड हल्ला करण्याचे आदेश भट्टीने दिले होते. या बदल्यात त्याला मोठी रक्कम, ड्रोनने हत्यारं पुरवणं आणि काम पूर्ण झाल्यावर दुबईला सुरक्षित पाठवण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. मात्र, त्याआधीच दिल्ली पोलिसांनी त्याला पकडले.

रील बनवण्याच्या नादात हरमन गँगस्टर्सच्या ग्लॅमरला भुलला होता. शाहजाद भट्टीच्या लक्झरी लाइफला पाहून त्याने गुन्हेगारी विश्वात पाऊल ठेवले. पाकिस्तानी हँडलर्स सोशल मीडियावर तरुणांच्या कमकुवत नसा ओळखतात. आधी रेकी करणे, मग व्हिडिओ पाठवणे आणि शेवटी ग्रेनेड हल्ल्यासारखी मोठी कामे देणे, अशा प्रकारे त्याला जाळ्यात अडकवण्यात आले.

लॉरेन्स बिश्नोई गँगशीही कनेक्शन?

कश्मीरी गेट परिसरात लॉरेन्स बिश्नोईच्या लीगल टीममधील एका वकिलावर गोळीबार झाला होता. या घटनेची जबाबदारी पाकिस्तानमधील हँडलरने घेतली होती आणि हरमनने दावा केला आहे की, त्याचे साथीदार या हल्ल्यात सामील होते. यामुळे गँगस्टर आणि दहशतवाद्यांचे हे नेक्सस अधिक गडद झाले आहे.
 

Web Title : दिल्ली पुलिस ने आतंकी मॉड्यूल का भंडाफोड़ किया; दुबई के वादे से युवा लालच में।

Web Summary : दिल्ली पुलिस ने तहरीक-ए-तालिबान हिंदुस्तान से जुड़े 18 वर्षीय युवक को गिरफ्तार कर एक आतंकी मॉड्यूल का भंडाफोड़ किया। उसने पुलिस स्टेशन पर ग्रेनेड हमले सहित हमलों की योजना बनाई, दुबई यात्रा का वादा किया गया था, और वह पाकिस्तानी हैंडलर्स और संभवतः लॉरेंस बिश्नोई गिरोह से जुड़ा था।

Web Title : Delhi Police bust terror module; youth lured by Dubai promise.

Web Summary : Delhi Police exposed a terror module, arresting an 18-year-old linked to Tehrik-e-Taliban Hindustan. He planned attacks, including a grenade attack on a police station, promised Dubai trip, and was connected to Pakistani handlers and possibly the Lawrence Bishnoi gang.