नवी दिल्ली - देशाची राजधानी दिल्लीत ३० नोव्हेंबरला दिल्ला महापालिकेच्या १२ वार्डात पोटनिवडणूक झाली होती. या पोटनिवडणुकीच्या निकालात भाजपाने १२ पैकी ७ जागांवर विजय मिळवला तर आम आदमी पक्षाने ३ जागा पटकावल्या. काँग्रेसने एका जागेवर खाते उघडले तर एका अपक्ष उमेदवारानेही निवडणुकीत बाजी मारली. या पोटनिवडणुकीच्या निकालात भाजपाला फटका बसला आहे, कारण ज्या १२ वार्डात पोटनिवडणूक झाली होती त्यातील ९ जागांवर भाजपाचा आधी कब्जा होता. मात्र या निकालात केवळ ७ जागा भाजपाने जिंकल्या.
महापालिकेच्या पोटनिवडणुकीत खूप कमी प्रमाणात मतदान झाले. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. कुठल्याही परिसरात अनुचित घटना घडली नाही. ३० नोव्हेंबरला झालेल्या मतदानाचे निकाल ३ डिसेंबर रोजी समोर आले. या निकालात विनोद नगर वार्डातून भाजपाच्या सरला चौधरी १७६९ मतांनी जिंकल्या. द्वारका ब या वार्डात भाजपाच्या मनीषा देवी यांनी ९१०० मतांनी विजय मिळवला. अशोक विहार इथे भाजपाच्या वीजा असीजा ४०५ मतांनी विजयी झाल्या. ग्रेटर कैलाश येथे भाजपाच्या अंजुम मॉडल यांनी ४१६५ मते मिळवून विजयी झाल्या. दिंचाऊ कला वार्डात भाजपाच्या रेखा राणी ५६३७ मतांनी जिंकल्या.
चांदनी महल वार्डात मोहम्मद इमरान यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला होता. इमरान यांनी या निवडणुकीत ४५९२ मतांनी विजय मिळवला. मुंडका वार्डात आम आदमी पक्षाचे अनिल यांनी १५७७ मतांनी विजय मिळवला. संगम विहार ए येथे काँग्रेसचे सुरेश चौधरी विजयी झाले. त्यांनी ३६२८ मतांनी विजय मिळवला. शालीमार बाग बी या वार्डात भाजपाच्या अनिता जैन यांनी सर्वाधिक १०१०१ मताधिक्य मिळवले. दक्षिण पुरी वार्डात आम आदमी पक्षाचे राम स्वरुप कनौजिया यांनी २२६२ मतांनी विजय मिळवला. चांदनी चौकात भाजपाच्या सुमन कुमार गुप्ता यांनी बाजी मारली. नारायणा वार्डात आम आदमी पक्षाचे राजन अरोडा हे केवळ १४८ मतांनी विजयी झाले.
भाजपाला या पोटनिवडणुकीत ७ जागा मिळाल्या, जे त्यांच्यासाठी नुकसानदायक ठरले. कारण ज्या १२ वार्डात निवडणूक झाली त्यातील ९ जागांवर भाजपाचा विजय झाला होता. १२ जागांवरील पोटनिवडणुकीत १४३ मतदान केंद्रात ५८० बूथवर मतदान करण्यात आले होते. त्यात अनेक जागांवर आम आदमी पक्ष आणि भाजपा यांच्यात थेट लढत होती. त्यामुळे आजच्या निकालांवर सगळ्यांचे लक्ष होते. दिल्ली महापालिकेत २०२२ साली निवडणूक झाली तेव्हा भाजपाने ११५ जागांवर विजय मिळवला होता.
Web Summary : BJP won 7 of 12 Delhi municipal by-election seats, losing ground. AAP secured 3, Congress gained 1, independent won 1. BJP previously held 9 of these seats. Low voter turnout marked the election.
Web Summary : दिल्ली नगर निगम के 12 उपचुनावों में भाजपा ने 7 सीटें जीतीं, नुकसान हुआ। आप को 3, कांग्रेस को 1, निर्दलीय को 1 सीट मिली। पहले भाजपा के पास इनमें से 9 सीटें थीं। मतदान कम हुआ।