Delhi Horror: महिलेला फरफटत नेणाऱ्या ५ आरोपींपैकी एक जण भाजपाचा नेता, कोण आहे तो? धक्कादायक माहिती समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2023 14:12 IST2023-01-02T14:11:10+5:302023-01-02T14:12:51+5:30
Delhi Horror: राजधानी दिल्लीतील सुलतानपुरीमधील कंझावाला भागात घडलेल्या एका भयानक घटनेमुळे संपूर्ण देशात खळबळ उडालेली आहे. ज्यांनी या भयावह घटनेचे फोटो आणि व्हिडीओ पाहिलेत त्यांचा थरकाप उडाला आहे.

Delhi Horror: महिलेला फरफटत नेणाऱ्या ५ आरोपींपैकी एक जण भाजपाचा नेता, कोण आहे तो? धक्कादायक माहिती समोर
राजधानी दिल्लीतील सुलतानपुरीमधील कंझावाला भागात घडलेल्या एका भयानक घटनेमुळे संपूर्ण देशात खळबळ उडालेली आहे. ज्यांनी या भयावह घटनेचे फोटो आणि व्हिडीओ पाहिलेत त्यांचा थरकाप उडाला आहे. आरोपी पीडित तरुणीला चार किलोमीटरपर्यंत फरफटत घेऊन गेले. त्यामुळे या दुर्घटनेत या तरुणीचा मृत्यू झाला. आता या प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या या भयावह घटनेमधील जे पाच आरोपी आहेत. त्या आरोपींपैकी एकजण भाजपाच नेता आहे. त्याचं नाव मनोज मित्तल असल्याचं समोर आलं आहे. दिल्लीतील सुलतानपुरी भागात त्याचं रेशनचं दुकान आहे. तसेच त्या परिसरात त्याचे पोस्टर्सही लावलेले दिसून येतात. या पोस्टर्समधून मनोज मित्तल याला भाजपा वॉर्ड क्र-४२ मंगोलपुरीचा सहसंयोजक बनवल्याबद्दल पक्षनेतृत्वाचे आभार मानण्यात आलेले आहेत.
ही धक्कादायक घटना जेव्हा घडली तेव्हा मनोज मित्तल हा कारमध्ये उपस्थित होता. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. त्यामध्ये सदर तरुणी बलेनो कारखाली अडकलेली दिसत आहे. तर कारचालक तिला फरफटत नेत यूटर्न घेताना दिसत आहे.
दरम्यान, हा प्रकार पाहणारा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार दीपक याने सांगितले की, कार सर्वसामान्य वेगाने धावत होता. तसेच कारचालकाची मनस्थितीही सामान्य असल्याचे वाटत होते. पहाटेच्या वेळी दीपक हा दुधाच्या डिलिव्हरीची वाट पाहत होता. तेव्हाच त्याने या कारला येताना पाहिले. कारच्या मागच्या चाकांमधून जोरात आवाज येत होता.