Delhi high court issues notice to sonia gandhi rahul gandhi in national herald case over bjp mp subramanian swamy plea | National Herald Case : काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधींना दिल्ली उच्च न्यायालयाची नोटीस

National Herald Case : काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधींना दिल्ली उच्च न्यायालयाची नोटीस

ठळक मुद्देनॅशनल हेराल्ड प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने खालच्या न्यायालयाच्या सुनावणीला स्थगिती दिली आहे.सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह इतरही काही मंडळींना नोटीस.सुब्रह्मण्यम स्वामी यांनी नॅशनल हेराल्ड प्रकरणी खालच्या न्यायालनाने दिलेल्या निर्णयाला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

 
नवी दिल्ली - नॅशनल हेराल्ड प्रकरणात (National Herald Case) दिल्ली उच्च न्यायालयाने खालच्या न्यायालयाच्या सुनावणीला स्थगिती दिली आहे. याच बरोबर न्यायालयाने सोमवारी आरोपी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी Sonia Gandhi) आणि काँग्रेस नेते राहुल गांधी तथा इतर काही मंडळींना नोटीस बजावत, भाजप खासदार सुब्रमण्यन स्वामी (Subramanian Swamy) यांच्या याचिकेसंदर्भात उत्तरही मागितले आहे. खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी नॅशनल हेराल्ड प्रकरणी खालच्या न्यायालनाने दिलेल्या निर्णयाला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. (Delhi high court issues notice to sonia gandhi rahul gandhi in national herald case over bjp mp subramanian swamy plea)

काँग्रेसच्या हाती आला मोठ्ठा भोपळा; मोदी-शहांचा आणखी एक जोरदार दणका

सोनिया गांधी तथा इतरांवर खटला चालवण्यास दिला होता नकार -
खालच्या न्यायालयाने स्वामी यांनी दाखल केलेल्या याचिकेतील मुख्य साक्षींच्या आधारे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी तसेच इतरांवर खटला चालविण्याची परवानगी देण्यास नकार दिला होता. आता न्यायमूर्ती सुरेश कैत यांनी सोनिया गांदी, राहुल गांधी, एआयसीसी महासचिव ऑस्कर फर्नांडिस, सुमन दुबे, सॅम पित्रोदा आणि ‘यंग इंडिया’ (वायआय) यांच्या कडून 12 एप्रिलपर्यंत स्वामींच्या याचिकेवर उत्तर मागवले आहे.

मोदी-शाहंच्या 'खेळी'मुळे काँग्रेसचा 'खेळ खल्लास'; किरण बेदींना हटवलं, पुडुचेरी सरकार पाडलं!

फसवणूक आणि अयोग्य मार्गाने पैसा मिळविण्याचे षड्यंत्र केल्याचा आरोप -
भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांच्या वतीने वकील सत्या सभरवाल आणि गांधी कुटुंब तथा इतरांकडून वकील तरन्नुम चीमा यांनी, उच्च न्यायालयाने नोटीस जारी केल्यासंदर्भात आणि 12 एप्रिलपर्यंत सुनावणी स्थगित केल्यासंदर्भात पुष्टी केली आहे. स्वामी यांनी खालच्या न्यायालयात दाखल केलेल्या आपल्या तक्रारीत सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याशिवाय इतरही काही लोकांवर फसवणूक आणि अयोग्य मार्गाने पैसा मिळविण्याचे षड्यंत्र केल्याचा आरोप केला होता.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Delhi high court issues notice to sonia gandhi rahul gandhi in national herald case over bjp mp subramanian swamy plea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.