मोदी-शाहंच्या 'खेळी'मुळे काँग्रेसचा 'खेळ खल्लास'; किरण बेदींना हटवलं, पुडुचेरी सरकार पाडलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2021 12:59 PM2021-02-22T12:59:37+5:302021-02-22T13:02:25+5:30

congress government falls in puducherry : अमित शाह, मोदींची खेळी झाली यशस्वी, पुडुचेरीतील काँग्रेसचं सरकार कोसळलं

Modi-Shah's' game 'causes Congress' game to fall apart; Kiran Bedi removed, Puducherry government overthrown! | मोदी-शाहंच्या 'खेळी'मुळे काँग्रेसचा 'खेळ खल्लास'; किरण बेदींना हटवलं, पुडुचेरी सरकार पाडलं!

मोदी-शाहंच्या 'खेळी'मुळे काँग्रेसचा 'खेळ खल्लास'; किरण बेदींना हटवलं, पुडुचेरी सरकार पाडलं!

Next
ठळक मुद्देअमित शाह, मोदींची खेळी झाली यशस्वी, पुडुचेरीतील काँग्रेसचं सरकार कोसळलंयापूर्वी पुडुचेरीच्या नायब राज्यपाल किरण बेंदींनाही आलं होतं हटवण्यात

पुडुचेरीमध्येकाँग्रेसला मोठा झटका लागला आहे. पुडुचेरीचे मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांना विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यात अपयश आलं. त्यानंतर पुडुचेरीतील सरकारल कोसळलं. पुडुचेरी विधानसभा अध्यक्षांनी मुख्यमंत्री नारायणसामी बहुमत सिद्ध करण्यात अपयशी ठरल्याची घोषणा केली. त्यानंतर मुख्यमंत्री नारायणसामी यांनी उपराज्यपालांना आपला राजीनामा सोपवला. रविवारी दोन आमदारांनी आपला राजीनामा दिल्यानंतर पडुचेरीमध्ये राजकारण तापलं होतं. पुडुचेरीच्या नायब राज्यपाल पदावरून किरण बेदी यांना हटविताना त्याचा काँग्रेसला फायदा मिळू नये, अशी व्यवस्था मोदी सरकारनं केली होती. 

राज्यातील काँग्रेसच्या चार आमदारांनी राजीनामे दिल्याने नारायणस्वामी सरकार अल्पमतात आलं होतं. किरण बेदी यांनीच हे घडवून आणलं, अशी टीका काँग्रेस करत होती. त्यामुळे लवकरच होणाऱ्या विधानसभा निवडणुकांत काँग्रेसला सहानुभूती मिळेल, अशी शक्यता व्यक्त होत होती. याच कारणामुळे बेदी यांना हटवून काँग्रेसच्या पायाखालची चादर भाजपने काढली. गृहमंत्री अमित शाह यांनी योग्य वेळी ही खेळी केली.

सहानुभूती मिळणं कठिण

किरण बेदीच पदावर नसल्यानं काँग्रेसला सहानुभूती मिळणं अवघड होईल. राज्यात निवडणुका असल्याने राहुल गांधी यांनी काही दिवसांत तेथील नेत्यांशी दिल्लीत चर्चा केली. विश्वासातील नेते दिनेश गुंडू राव यांच्याकडे पुडुचेरीची जबाबदारी सोपविली. राहुल गांधी बुधवारी पुडुचेरीच्या दौऱ्यावर असल्यानं त्याआधी एक दिवस बेदी यांना दूर करण्यात आलं. 

बेदींना दूर करण्याची मागणी

सरकारच्या कामात निष्कारण हस्तक्षेप करणाऱ्या, सरकारला काम करू न देणाऱ्या किरण बेदी यांना दूर करावे, अशी मागणी मुख्यमंत्री नारायणस्वामी यांनी सातत्यानं केली होती. भाजपनं पुडुचेरी निवडणुकांसाठी केंद्रीय मंत्री अर्जुनराम मेघवाल व राजीव चंद्रशेखर यांची नेमणूक केली आहे. त्यांच्यामार्फत हा केंद्रशासित प्रदेश ताब्यात घेण्याचा अमित शहा व जे. पी. नड्डा यांचा प्रयत्न आहे.

काय आहे राजकारण?

तेलंगणाच्या राज्यपाल तामिळसाई सौंदरराजन यांच्याकडे काही काळासाठी पुडुचेरीची जबाबदारी सोपवण्यातही राजकारण आहे. तामिळ भाषकांच्या पुडुचेरीत मूळ तामिळनाडूच्या सौंदरराजन काम पाहतील. नारायणस्वामी यांच्याप्रमाणेच सौंदरराजन याही नाडर समाजाच्या आहेत.

Web Title: Modi-Shah's' game 'causes Congress' game to fall apart; Kiran Bedi removed, Puducherry government overthrown!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.